मुंबई : अलीकडेच अभिनेत्री मौनी रॉयने तिचा  बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन सूरज नांबियारसोबत लग्न केलं. हे लग्न एक भव्या डेस्टिनेशन वेडिंग होतं. जे गोव्यात पार पडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नात मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या घरातील लोकं आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आलं होतं.  लग्नसोहळ्यानंतर आता मौनीचा पूल पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पूल पार्टीचा व्हिडिओ बिझनेसमन सूरज नांबियारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून या व्हिडिओला आत्तापर्यंत 1.66 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे 19 हजार लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये नवविवाहित कपल सूरज नांबियार आणि मौनी रॉय त्यांच्या खास मित्रांसोबत गाताना आणि डान्स करताना दिसत आहेत.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मौनी रॉय आणि सूरजसोबत अर्जुन बिजलानी, मंदिरा बेदी आदी अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. पार्टीदरम्यान सगळे पाहुणे पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसतायेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओच्या शेवटी, मौनी रॉय आणि सूरज नांबियार एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत. ज्यामुळे तुम्हाला या दोघांच्या केमिस्ट्रीचा अंदाज येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरज नांबियार हा दुबईचा बिझनेसमन आहे आणि तो आणि मौनी 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत.