मुंबई : अभिनेत्री मौनी रॉयने नुकताच तिच्या मैत्रिणींसोबत जोरदार पार्टी केली. मौनी रॉय सध्या तिच्या गर्ल्स गँगसोबत गोव्यात आहे. तिच्यासोबत तिच्या जवळच्या मैत्रिणी आश्का गोराडिया, अनुराधा खुराना, रोहिणी अय्यर, निधी कुर्डा आणि रुपाली काद्यान देखील आहेत. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोणाला पाहून अभिनेत्रीने तिच्या मित्रांसोबत गुपचूप बॅचलर पार्टी एन्जॉय केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टीत मौनी रॉयच्या हातात पार्टी प्रॉप दिसत आहे. ज्याला पाहून चाहत्यांनी 'ब्राइड टू बी' प्रॉप असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मौनी लवकरचं लग्न बेडीत अडकणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मौनी बॉयफ्रेंडसोबत नव्या आयुष्याला सुरूवात करणार असल्याची चर्चा रंगत आहे. 



मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सप्तपदी घेण्यासाठी तयार झाली आहे. मौनी आणि सूरजचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. हे लग्न दुबई किंवा इटलीमध्ये होणार आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या कूचबिहार त्यांच्या मूळ जिल्ह्यात रिसेप्शन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 



मौनी रॉय आणि सूरज नांबियार बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच मौन बाळगणाऱ्या मौनीने आजतागायत तिच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.