Mouni Roy New Song Spark Plastic Surgery Rumours : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही नेहमीच चर्चेत असते. मौनी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मौनीनं तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सविषयी सोशल मीडियावर अपडेट देताना दिसते. आता नुकतीच मौनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे मौनचं नवं गाणं आहे. तिच्या नव्या गाण्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौनी ही अरबी गायक डिस्टिंक्टसोबत त्याच्या एका नवीन म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. नुकत्या प्रदर्शित झालेल्या या गाण्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले. तर या गाण्याचं नाव 'जालिमा' असं आहे. या गाण्यात मौनीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी तर तिनं तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मौनीनं डोळे आणि चेहरा बदलल्या सारखा दिसत असल्याचं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात नेटकऱ्यांनी मौनीचा हा नवा लूक आवडलेला नाही. नेटकऱ्यांनी मौनीच्या लूकवरून तिला 'नन' आणि 'प्लास्टिक' बोलण्यास सुरुवात केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

इतकंच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी हे गाणं आणि मौनीच्या मोरोक्कन डान्स मुव्ह्स पाहताच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी म्हटलं की 'नोरा फतेही आणि जेनिफर विंगेटला तरी घेतलं असतं.' 'मौनीपेक्षा नोराला कास्ट करायला हवं होतं. चांगलं दिसलं  असतं', असं एक नेटकरी म्हणाला. दुसरा नेटकरी म्हणाला, 'मौनीच्या डोळ्यांना काय झाले? तिनेही डोळ्यांवर प्लास्टिक सर्जरी केली आहे का?'. तिसरा नेटकरी म्हणाला की 'मौनी खूप वाईट दिसते.'


'जालिमा' या गाण्याविषयी बोलायचं झालं तर त्याला एक अरेबिक टच आहे. त्याचं कारण म्हणजे त्याला डिस्टिंक्टनं गायलं आहे तर त्यासोबत श्रेया घोषालनं देखील हे गाणं गायलं आहे. 


हेही वाचा : ना अभ्यास, ना बोर्ड... ; अशी आहे मधुरणारीच्या लेकीची हटके शाळा!


मौनीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा' मध्ये दिसली होती. त्यावेळी मौनीच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा सुरु होती. त्याचं कारण म्हणजे पहिल्यांदाच मौनी ही खलनायकाच्या भूमिकेत दिसली.