मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. तिने आपल्या विवाह सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 27 जानेवारी रोजी विवाह सोहळा गोव्यामध्ये संपन्न झाला.तिने बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाह केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरज नांबियार साऊथ इंडियन तर मौनी रॉय बंगाली आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्यातील खास झलक आता समोर आली आहे. ब्राईडल गेटअपमध्ये मौनी रॉय अप्सरा दिसत असल्याची चर्चा रंगते आहे. मौनी आणि सूरजचे लग्नाच्या मंडपातील खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 


वऱ्हाडींसमोरच मौनी रॉय आणि सूरज  रोमान्स करताना दिसले. मौनीने सूरजला KISS करत प्रेम व्यक्त केलं. मौनीच्या लग्नाचा अल्बम व्हिडिओ समोर येताच तो व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


 मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या यांचं लग्न खास लोकांच्या उपस्थितमध्ये पार पडलं होतं. ज्यामध्ये आमना शरीफ आणि मंदिरा बेदी मौनीच्या वतीने प्रत्येक विधीमध्ये आपली उपस्थिती नोंदवली होती.