मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नाग चैतन्य यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं मागच्या अनेक काळापासून म्हटलं जात होतं. याला प्रमाण देणाऱ्या काही घटनाही घडल्या. त्यातच भर टाकणारी आणखी एक घटना पुन्हा घडली आहे. एकिकडून समंथा किंवा नाग चैत्यन्य कोणत्याच पद्धतीनं त्यांच्या नात्याबाबत नेमका खुलासा करताना दिसत नाहीयेत. त्यातच आता यांच्यातील दुरावा नेमका कोणत्या वळणावर पोहोचला आहे हे अधिकच स्पष्ट होताना दिसत आहे. (samantha akkineni naga chaitanya Divorce )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'लव स्टोरी' या चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या निमित्तानं नुकतंच एका सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री साई पल्लवी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक शेखक कमुल्ला यांचीही हजेरी होती. नाग चैतन्यचे वडील, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनही या पार्टीला पोहोचले होते. चित्रपटाच्या क्र्यू मेंबर्सपासून या पार्टीला सर्वांचीच हजेरी असताना नाग चैतन्यची पत्नी समंथा मात्र इथं कुठेच दिसली नाही. 


काऊन्सिलिंगनंतरही नाही बदलला निर्णय 
समंथा आणि नाग चैतन्य यांच्या नात्याबाबत फार काहीच माहिती समोर आलेली नसली तरीही सूत्रांच्या माहितीनुसार घटस्फोटाच्या निर्णयानंतर कुटुंब न्यायालयात या दोघांचं समुपदेशन अर्था काऊन्सिलिंगही करण्यात आलं. पण, त्यानंतरही त्यांचा निर्णय बदलला नाही. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून यानंतर समंथाला 50 कोटी रुपयेही मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


समंथानं काही महिन्यांपूर्वी तिच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरील युजर नेममधून समंथा अक्किनेनी हे नाव बदलून एस, इतकंच युजर नेम ठेवलं आणि तिनं केलेल्या या बदलाचे पडसाद दूरवर उमटल्याचे पाहायला मिळाले.