खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही, ही इतकी मोठी व्यक्ती असं का म्हणतेय ?
पाहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय...
मुंबई : नागपूर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. सध्याच्या राजकीय वर्तुळाचा संदर्भ घ्यायचा झाल्यास नागपूर म्हणजे खूप काही. नेतेमंडळींची ये-जा असणाऱ्या आणि मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या याच नागपूरबद्दल आता एक असं वक्तव्य समोर येत आहे, ज्यावर अनेक प्रतिक्रिया आणि मतमतांतरं समोर येण्याची शक्यता आहे. (Maharashtra nagpur pune)
खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही... हेच ते वक्तव्य. एका अतिशय बड्या आणि दिग्गज कलाकारानं हे म्हटलंय आणि त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचेच कान टवकारले आहेत.
खरंतर हे वक्तव्य सध्या केलेलं नाही. कैक वर्षांपूर्वी केलेल्या या वक्तव्यामुळं आता चर्चांना उधाण येण्यास कारणीभूत ठरत आहे एक चित्रपट.
'मी वसंतराव' या सांगितीक मेजवानी असणाऱ्या या चित्रपटामध्ये पंडित वसंतराव देशपांडे आणि पु.लं. देशपांडे यांच्यातील मैत्रीही दाखवण्यात आली आहे. काही दिवसांतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्याआधीच काही व्हिडीओंच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम संपूर्ण टीम करताना दिसत आहे.
आता पुलं म्हटलं की मिश्किल ताशेरे ओढणं आलंच. अगदी तसंच वक्तव्यं पुलंनी नागपूरकरांसमोर केलं होतं. वसंतराव देशपांडेंचा उल्लेख त्यांनी पुणेकर म्हणून करताच आणि त्यानंतर हा टोला लगावताच त्यावेळी त्यांच्या आईनं पुलंच्या दिशेनं लाटणं भिरकावून लावलं होतं.
त्याच क्षणाला चित्रीत करत, याचा एक व्हिडीओ गायक - अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक राहुल देशपांडे यानं प्रेक्षकांच्या भेटीला आणला.
त्याचा हा व्हिडीओ सध्या नागपूरकरांना व्यक्त होण्यात भाग पाडताना दिसत आहे. एका चित्रपटाच्या आणि मुख्य म्हणजे पुलंच्या वक्तव्याच्या निमित्तानं सुरु असणाऱ्या या चर्चांबाबत तुमचं काय मत ?