मुंबई : मागील काही काळापासून प्रदीर्घ आजारपणाचा सामना करणाऱ्या अभिनेता फराज खान यांचं वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी निधन झालं आहे. बंगळुरू येथूल एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अभिनेत्री पूजा भट्टनं त्यांच्या निधनाबाबतची माहिती दिली. यापूर्वी तिनं त्यांच्या आजारपणाचीही माहिती दिली होती. फराज यांनी अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यासह 'मेहंदी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फराजच्या निधनाबाबत माहिती देत पूजानं ट्विटमध्ये लिहिलं, 'अतिशय जड अंत:करणानं मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, फराज खान आपणा सर्वांना सोडून गेले आहेत. मी आशा करते की, आता ते एका चांगल्या विश्वात असतील. तुम्ही (त्यांच्यासाठी) जी मदत केली, त्यासाठी धन्यवाद. फराजला त्याच्या कुटुंबाची ससर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही मदत केली. त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. कारण फराजची जागा कोणीच घेऊ शकत नाही'.


गेल्या काही दिवसांपासून फराज आजारपणाशी झुंज देत होता. त्याला आर्थिक मदतीसाठी म्हणून खुद्द पूजा भट्ट हिनं सर्वांनाच विनंती केली होती. सलमान खान यानंसुद्धा फराजच्या कुटुंबीयांना मदत देऊ केली होती. 



 


फराज यांच्या चित्रपट कारकिर्दीविषयी सांगावं तर, ९० च्या दशकाअखेर त्यानं बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ज्यामध्ये 'फरेब', 'मेहंदी' या चित्रपटांचा समावेश होता.