`या` राज्यांत पद्मावतवर बंदी!
भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान आणि गुजरातमध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान आणि गुजरातमध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता हरियाणातही यावर बंदी घालण्यात आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, हरियाणाचे मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय सेंसर बोर्डाच्या निर्णयानंतर घेणार होते. मात्र हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी सांगितले की, कायद्याचा विचार करता चित्रपटावर राज्यात बंदी घालायला हवी. मंत्रीमंडळाने या निर्णयाला दुजोरा दिला असून हरियाणात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
चार मोठ्या राज्यात बंदी
सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत हा चित्रपटाला सेंसर बोर्डातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पद्मावत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तरीही देखील चित्रपटामागील शुल्ककाष्ट काही संपले नाही. गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
करणी सेनेचा जबरदस्त विरोध
राजस्थानातील धोलपूरमध्ये करणी सेनेच्या समर्थकांनी पद्मावतला जबरदस्त विरोध केला. करणी सेनेचे मुख्य लोकेंद्र सिंह कल्वी यांनी सांगितले की, हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर बॅन करण्यात यावा. मी पुन्हा पुन्हा देशाच्या पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच सांगेन की त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्या.