`पापा कहते हैं` फेम अभिनेता बाजुनं गेला तरी ओळखता येणार नाही
त्या दोघांवर `पहेले प्यार का पहला गम` हे गाणं शूटही झाले होते.
Jugar Hansraj : नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिरो फेमस झाले त्यातून काही सुपरहिरो हे पुढे सुपरहिट चित्रपट देऊ शकले नाहीत. पण अभिनय कारकीर्द जरी सोडली तरी ते आपल्याला व्यवसायात फारच खुश आहेत. असाच एक अभिनेता आहे तो म्हणजे जुगर हंसराज. कधीकाळी 'पापा कहते हैं' हा चित्रपट त्याच्या नावावर होता आणि त्यात जुगर हंसराज आणि अभिनेत्री मयुरी कांगो ही जोडी फारच गाजली होती. त्या दोघांवर 'पहेले प्यार का पहला गम' हे गाणं शूटही झाले होते. जे त्यावेळी प्रचंड गाजले होते.
पण आता हा अभिनेता पुर्णतः बदलला असून त्याचा लुकही आता ओळखता येत नाहीये. त्याने नुकताच आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला तेव्हा त्याने आपले लेटेस्ट फोटो इन्टाग्रावर शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये त्याचा लुक हा पुर्णतः बदलला आहे. त्याचे केस पिकले आहेत आणि त्यामुळे त्याचे वाढलेले वयंही सहज ओळखून येते आहे. तरूणपणी हाच अभिनेता फारच हॅण्डसम आणि गोंडस होता. त्या काळी त्याच्यावर फिदा होणाऱ्या मुलींचीही लांबच लांब रांग होती. सध्या हा अभिनेता अमेरिकेत असतो.
जुगल हंसराज याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. जुगल हंसराज एक अभिनेता, मॉडेल, निर्माता लेखक आणि दिग्दर्शक आहे. हंसराजने 1983 मध्ये 'मासूम' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, ज्यामध्ये तो बालकलाकार म्हणून दिसला होता. उर्मिला देखील या चित्रपटात बालकलाकार म्हणून होती. नंतर तो 'कर्मा' (1986) आणि 'सल्तनत' (1986) सारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसला. त्याने लहानपणी टीव्ही आणि प्रिंटसाठी मॉडेलिंगही केले. 1994 मध्ये तो 'आ गले लग जा' या चित्रपटामधून नायकाच्या भूमिकेत दिसला होता.
जुगल हंसराजने आपला वाढदिवस इटलीतील फ्लोरेन्समध्ये साजरा केला आहे. तिथून त्याने फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. फोटोमध्ये त्यांची पत्नी जस्मिन ढिल्लन हंसराज देखील दिसत होती. या जोडप्याने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. 90 च्यानंतर तो 'मोहब्बतें' (2000), 'कभी खुशी कभी गम' (2001) आणि 'सलाम नमस्ते' (2005) अशा चित्रपटांतून त्याने साहाय्यक भुमिका केली. 2008 चा अॅनिमेटेड चित्रपट 'रोडसाइड रोमिओ'साठी त्याने स्क्रिप्ट लिहिली. त्यासोबतच त्याने माधूरी दीक्षितचा 'आजा नचले', 'कहानी', 'प्यार इम्पोसिबल 'अशा चित्रपटांतूनही काम केलं आहे.