चिमुकल्या `पुष्पा`ची एंट्री पाहून सर्व हैराण, विचारलू लागले `ये कब हुआ`?
चिमुरड्यची Pushpa Style एंट्री; नाव पुष्पाच ठेवायचं का? पाहा Viral Video
मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर 'पुष्पा' (Pushpa Movie) या चित्रपटानं प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांवर जादू केली. चित्रपटातील संवादांपासून गाण्यांपर्यत आणि अगदी त्यातील स्टाईलपर्यंत सर्वकाही सिनेरसिकांना वेड लावून गेलं.
रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाचा डंका ओटीटी वरही पाहायला मिळाला. रिल्स म्हणू नका किंवा गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन, प्रत्येक ठिकाणी पुष्पा आणि फक्त पुष्पाच.
आता म्हणे एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवजात बालकानंही या चित्रपटातील स्टाईल, कॉपी केली आहे.
विश्वास बसंत नाहीये, तर आधी हा व्हिडीओ पाहा.
‘मैं झुकेगा नहीं’ या डायलॉगवर हा चिमुरडा पुष्पाप्रामाणंच त्याच्या हनुवटीखालून हात फिरवताना दिसत आहे. बरं, तोसुद्धा हुबेहूब अल्लू अर्जुननं फिरवला तसाच.
अवघ्या काही सेकंदांमध्ये हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आणि ट्रेंडही करु लागला.
बरं जन्माला आलेल्या या बाळाचं नाव पुष्षाच ठेवायचं का, असे प्रश्नही नेटकऱ्यांनी कमेट बॉक्समध्ये केले.
काहींना तर हा ज्युनिअर पुष्पा वाटला, अरेच्छा... हे केव्हा झालं असे मिश्किल प्रश्नंही काहींनी केले.
दरम्यान, दाक्षिणात्य कलाजगताची देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेली लोकप्रियता नेमकी किती आहे हेच हा व्हिडीओ पाहताना लक्षात येत आहे.
आता मुद्दा असा, की खराखुरा पुष्पा अर्थात अभिनेता अल्लू अर्जुन याच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचतो का आणि पोहोचल्यास हा क्यूट पुष्पा पाहून तो काय म्हणतो....?