मुंबई : 'बद्रीनाथ की दुल्हनिया', ' 2स्टेट्स' नंतर आलिया भट्टचा 'राझी' चित्रपट 100 करोड क्लबमध्ये दाखल झाला आहे. 11 मे रोजी 'राझी' रिलीज झाला. मात्र अजूनही 'राझी' पहायला चित्रपटागृहात चांगली गर्दी आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगली पसंती दिली आहे . 


100 कोटींची कमाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राझी चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर तरण आदर्शने याबाबत ट्विट केले आहे. 'राझी' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. 



भारतीय महिला गुप्तहेराची कहाणी  


आलिया भट्ट 'राझी' चित्रपटामध्ये एका महिला गुप्तहेराची भूमिका साकारते. आलिया भारतीय गुप्तहेर असून तिचं एका पाकिस्तानी पोलिस ऑफिसरसोबत लग्न होते. पाकिस्तानातून ती देशासाठी कसे काम करते हे पाहणं उत्सुकतेचे आहे. हरिंदर सिक्का यांच्या ' कॉलिंग सेहमत' या कादंबरीवर 'राझी' चित्रपट आधारित आहे. ही एक सत्यकथा आहे. चित्रपटातील 'दिलबरो' आणि 'ए वतन' ही गाणी उत्तम झाली आहेत.