जयंती वाघधरे, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : विजू माने दिग्दर्शित मंकी बात हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अनेक दिवसांनंतर खरंतर एक बालचित्रपट मंकी बात या सिनेमाच्या निमित्तानं आपल्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांसाठी हा बालचित्रपट एक छान पर्याय असू शकतो.. कसा आहे मंकी बात? काय आहे या सिनेमाची स्टोरी?


लहान मुलं खोडकर असतात यात काही गैर नाही मात्र  त्यांच्या खोड्या जेव्हा एखाद्याच्या जिवावर बेतू लागतात तेव्हा त्याच वेळी त्यांना थांबणंही गरजेचं असतं. मंकी बात हा सिनेमाही अशाच विषयावर भाष्य करतो... खरंतर चिमुकल्यांना त्यांच्या भाषेत समजवणं ही एक वेगळीच कला आहे.


काय आहे कथा?


वायू या मुलाची ही गोष्ट आहे.. वायू आपल्या दुनियेत छान रमलेला अशताना अचानक त्याचे बाबा मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतात. या निर्णयानं वायू खूप रागावतो.. त्याचे मित्र त्याच्यापासून दुरावतील या एका कारणामुळे त्याला मुंबईत जायचं नाहीय़े. मुंबईत आल्यानंतर वायू आणखी डिस्टर्ब होतो. नवीन मित्रासोबत पटत नाही, उटसूट सगळेच त्याला त्रास देत असतात. मग वायू यांना धडा शिकवायचा निर्णय घेतो.. 
वायू एक से बढकर एक खोड्या करत सगळ्यांवरचा सूढ घेतो.. याच दरम्यान साक्षात देव वायूला थांबण्याचा प्रयत्न करतो... त्याला अनेकदा सूचना देउन सुद्धा वायू कोणाचंच ऐकत नाही.. मग अखेर वायूला आपल्या कर्माची फळ भोगावी लागतात. 


मिळाले इतके स्टार्स


दिग्दर्शक विजू माने यांनी सिनेमाला छान ट्रीटमेन्ट दिली आहे.. बालचित्रपट असल्यामुळे सिनेमातील संवाद महत्तावाचे ठरतात.. संदीप खरे यांनी लिहलेले सिनेमातील संवाद लहान मुलांच्या सहज पंचनी पडतील असेच आहेत. सलील कुलकर्णी यांनी सिनेमाला दिलेलं संगीतही छान झालंय. अभिनेता अवधूत गुप्तेनं मंकी बातच्या निमित्तानं अभिनय क्षेत्रात पहिल्यांदाच पर्दापण केलंय. त्याचा अभिनय छान झालाय. सिनेमाची गोष्ट छान आहे मात्र पटकथेत काही त्रुटी जाणवतात. बालकलाकार वेदांत आपटेनं सुंदर काम केलंय. सिनेमातील हे सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला 3 स्टार्स.