Moving In with Malaika Show: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या दिलखुलास अंदासाठी कायमच ओळखली जाते. कलाजगतामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मलायकानं गेल्या काही दिवसांपासून नजरा वळवल्या आहेत, त्या म्हणजे तिच्या 'मूविंग इन मलाइका' (Moving In With Malaika) या कार्यक्रमामुळं. खरी मलायका नेमकी कशी आहे, हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळालं. पण याच कार्यक्रमात तिचा सख्ख्या बहिणीशी म्हणजेच अमृता अरोरा हिच्याशी (Amrita Arora) वाद झाला आणि पाहणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या. (Moving In with Malaika actress had an argument with sister Amrita Arora latest entertainment news)


वाद होण्यामागचं कारण काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मूविंग इन विद मलाइका'च्या व्हायरल होणाऱ्या एका प्रोमोमध्ये त्यांचा वाद नेमका का झाला, याचीच झलक पाहायला मिळत आहे. इथे मलायका तिच्या बहिणीच्या रुममध्ये जाते आणि तू मला का टाळतेयस? असा प्रश्न विचारताना दिसतेय. अमृता मात्र तिला कोणतंही उत्तर न देताच फोनमध्ये बघत राहते. तिचं हे वागणं काहीसं विचित्र वाटल्यामुळं मलायकासुद्धा तिच्याकडे नजर रोखून पाहू लागते. 


व्हिडीओमध्ये पुढे दाखवण्यात आलंय, की या दोघींमध्ये अभिनेता  डिनो मोरिया येतो आणि काहीतरी अॅडवेंचरसाठी जाण्याचा विषय काढतो. पण, मलायकाचा होकार आणि अमतृताचा नकार तिथं वादाला खतपाणी टाकतो. आपल्याला पाण्याची भीती वाटते आणि त्यातही मी कुठे गेले तर भांडणंच होतील असं ती मलायकाला म्हणताना दिसते. 


हेसुद्धा वाचा : 48 वर्षीय Malaika Arora च्या चमकदार त्वचेचे रहस्य...ती वापरते हे 3 घरगुती उपाय




अमृताचं हे वागणं पाहून मलायका भावूक होते आणि तू एक चांगली बहीण, पत्नी आणि आई असलीस तरीही चांगली बहीण केव्हा होशील? असा प्रश्न तिला विचारते. आपल्याला गरज असताना अमृता तिथे नसल्याचं म्हणत तिनं खंतही व्यक्त करत मन मोकळं केलं. दोन बहिणींच्या नात्यातही काही मतभेद, काही हेवेदावे असतात हेच इथं सर्वांना पाहायला मिळत आहे. 


वादास आणखी एक कारण, यावेळी निमित्त अर्जुन? 


बोलण्याबोलण्यामध्ये या दोन्ही बहिणींमध्ये आणखी एका विषयावरून वाद झाला. तो विषय म्हणजे आईच्या बांगड्या. आपण कदाचित पुन्हा लग्नाचा निर्णय घेऊ, त्यामुळं आईच्या बांगड्यांवर माझाच हक्क आहे असं ती इथं म्हणताना दिसली. अमृतानं मात्र इथं अनपेक्षित प्रतिक्रिया दिली. बरं लग्नाचा निर्णय घेण्यामागे Boyfriend अर्जुन कपूर (अर्जुन कपूर) कारण नसून, खरं कारण तर आईच्या बांगड्या आहेत असंही तिनं स्पष्ट केलं. बरं इथे मलायकानं नकळतच आपण लग्नासाठी तयार असल्याचा इशारा दिल्यामुळे या वादातून चाहत्यांना आनंदाचं निमित्तंही मिळत आहे. 


या दोन सेलिब्रिटी बहिणींमध्ये असणारे वादाचे विषय पाहता तुम्हीही तुमच्या बहिणीशी नेमके कोणत्या मुद्द्यावर भांडता किंवा कोणत्या विषयावर तुमचं एकमत होत नाही, हे कमेंट्समध्ये सांगा.