मुंबई : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर कायम त्यांच्या चर्चा रंगत असतात. कधी फोटो तर कधी व्हिडिओच्या माध्यमातून त्या जनतेच्या संपर्कात असतात. शिवाय संसदेतील  त्यांच्या विधानांमुळे देखील त्या चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक टीकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नुसरत यांच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये नुसरत आणि त्यांचे पती निखिल 'हे शोना..' या गाण्याचे लिप्सिंग करताना दिसत आहेत. या टीकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यातील केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. 



अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या रोमँटिक व्हिडीओला पसंदी दर्शवली आहे. नुसरत जहाँ यांचा पती निखिल जैनसोबतच बेडरुममधील एक रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. निखिल आणि नुसरत नेहमीच असे रोमँटिक व्हिडीओ शेअर करत असतात.


दरम्यान, नुसरत आणि प्रसिद्ध उद्योगपती निखील त्यांच्या कामांमध्ये कायम व्यस्त असतात. पण ते नेहमी आपल्या व्यस्त वेळापत्रकतून एकमेंकाना वेळ देताना दिसतात. ते कायम त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.