`लोक म्हणतात तुझे Thighs खूपच…’ अभिनेत्री मृणाल ठाकूरने सांगितला `सेक्सी` शब्दाचा अर्थ!
Mrunal Thakur : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या शरीरावर आणि वजन कमी करण्यावर त्याशिवाय सेक्सी शब्दाच्या अर्थाविषयी सांगितलं आहे.
Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरनं छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा जो प्रवास होतो तो अविश्वसनीय होता असं म्हणायला हरकत नाही. मृणालनं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तिचा हाय नाना हा तमिळ चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती सुरु आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सीता रामम या चित्रपटानंतर मृणालसाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले असं म्हणायला हरकत नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालनं अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यावेळी बोलत असताना मृणालनं सेक्सी शब्दाचा काय अर्थ आहे. याविषयी सांगितलं.
मृणालनं नुकतीच इंडियन एक्सप्रेसला ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मृणालनं तिच्या कामाविषयी आणि तिच्या शरीरावर करण्यात आलेल्या कमेंटवर बोलली आहे. यावेळी मृणाल म्हणाली, 'मी एका व्यक्तीला मिटींगसाठी भेटले होते. त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली, ओह्ह, मृणाल ती मुळीच सेक्सी नाहीस. मी त्याला विचारलं की तो माझ्या भूमिकेविषयी बोलतोय की एक व्यक्ती म्हणून माझ्याविषयी. तो म्हणाला ती भूमिका सेक्सी आहे, पण त्या भूमिकेला मी शोभेशी नाही असं त्याचं म्हणणं होतं. मी म्हटलं मग हे जाणून घेण्यासाठी सर तुम्ही एक लूक टेस्ट करून बघा आणि मग आम्ही ते केलं. जेव्हा फोटोग्राफर आता आला, मी ती भूमिका साकारू शकते असं त्याला वाटलंच नाही. त्याचं असं झालं की कोण आहे ही गावातली मुलगी? नंतर येऊन त्यानं माफी मागितली. मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे, ते तुम्हाला पूर्णपणे बदलतात. एक कलाकारा म्हणून माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की मी न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. जेणेकरून माझ्या आजुबाजूला असलेले लोक मला पाहिजे तसं दिसण्यासाठी तयार करू शकतात. जेव्हा तुम्ही सेक्सी विषयी बोलतात, म्हणजे जेव्हा मी याविषयी बोलते तेव्हा मला माझ्या बोटाजवळ असलेली डेड स्कीन जेखील सेक्सी वाटते. सेक्सी काही आहे तर ते बोलणं आहे, पण किती लोक कोणत्या गोष्टीवर चर्चा करु शकतात.'
हेही वाचा : मिर्झापूरचा ‘गुड्डू भैय्या’ बाप होणार! रिचा चढ्ढा, अली फजलनं इन्स्टावरून शेअर केली Good News
पुढे याविषयी सांगताना मृणाल म्हणाली, 'हे सगळं कोणत्याही व्यक्तीची सेक्सी विषयी असलेल्या व्याख्येवर अवलंबून आहे. लोक काय बघतात त्यांचे विचार काय यावरून या शब्दाची प्रत्येकाची परिभाषा असते. जेव्हा मी एक गाणं केलं. तेव्हा लोक बोलत होते, कृपया ते करू नको, तुला वजन कमी करण्याची गरज आहे. मी त्यांना म्हटलं, ऐका, माझ्या मांड्या जाड आहे, मला त्यानं काहीही तक्रार नाही. मला त्याची काही अडचन वाटत नाही तर तुम्हाला का वाटते? दरम्यान, काही निर्माते आहेत त्यांना याची काही अडचन नसते. महत्त्वाचं म्हणजे मला एखाद्या माती सारखं रहायचं आहे, जेणेकरून त्यांना पाहिजे त्या भूमिकेत मी बसू शकेन.'