मुंबई : 'मी मिरवणार  अन् समद्यांची जिरवणार' म्हणत, झी मराठी वरील 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताच या सिरीयला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या अमृता ढोंगडेने फार कमी वेळात मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनेत्री अमृता मध्यंतरी तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डल हॅक झाल्यामुळेही चर्चेत होती. अमृता सोशल  मीडियावर कायम सक्रिय असते. स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ नेहमी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता नुकतीच अमृताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृताने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहीलंय की, Happy Birthday मल्टी टॅलेंटेड सुमित पाटील उर्फ सुमा, May God bless you always, असेच हसत रहा आणि हसवत रहा, दंगा करत रहा , खुप फिल्म्स बनवा आणि आपलं ठरल्यापरमाणे तुमच्या प्रत्येक फिल्मची हिरोईन मिच असणार Waiting for "Jibenda"... अमृताने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांमध्ये ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यात कमालीची उत्सुकता दिसत आहे. अमृताने हे फोटो शेअर करताच चर्चांना उधाण आल्याचं तिच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे.


काहीजण शेअर केलेल्या या पोस्टवर सुमित पातील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तर काहीजण तिने शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत अभिनंदन असंही म्हणत आहेत. काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट ईमोजीही शेअर करत आहेत. अवघ्या काही वेळातच अमृताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र शेअर केलेल्या या पोस्टवर अमृताने ती व्यक्ती नेमकी कोण आहे हे सांगितलेलं नाही. पण तिच्या पोस्टवरुन तो मिस्ट्री बॉय तिचा जवळचा मित्र असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. 



अमृता धोंगडेचा मोठा चाहतावर्ग आहे. मूळची कोल्हापूरची असणारी अमृता छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा बनली आहे.विविध मालिकांमध्ये अमृता धोंगडेने साध्या सोज्वळ मुलीची भूमिका साकारल्या आहेत.मात्र खऱ्या आयुष्यात अमृता फारच ग्लॅमरस आहे. ती सतत स्टायलिश फोटो शेअर करत असते.अमृता धोंगडेला बिग बॉस मराठीमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. पण चाहते तिला आता मालिकेमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत.