मुंबई : टीव्ही विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंग आणि सिद्धार्थ शुक्लानंतर एमटीव्हीवरील 'लव्ह स्कूल' फेम अभिनेता जगनूर अनेजचं ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, 'जगनूर अनेजा इजिप्तमध्ये फिरण्यासाठी गेला होता. बुधवारी जगनूरने त्याच्या ट्रिपचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याने ट्रिप दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर करत होत. महत्त्वाचं म्हणजे जगनूरने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये तो फिट असल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रील व्हिडिओ शेअर करत जगनूर म्हणाला, 'जेव्हा मी गिझाचे महान पिरामिड पाहिले तेव्हा एक स्वप्न साकार झाले. माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली.' पण दुर्दैव म्हणजे खुद्द जगनूरला देखील ठावूक नव्हत ही त्याची अखेरची ट्रिप असेल. जगनूरच्या निधनाची बातमी कळताचं त्याच्या चाहत्यांना आणि  कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 


जगनूर यांनी एमटीव्ही लव्ह स्कूलच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये भाग घेतला. जगनूरने त्याची गर्लफ्रेन्ड मोनिकासोबतचे संबंध सोडवण्यासाठी शोमध्ये भाग घेतला. पण त्यांचं नातं फार काळ टिकू  शकलं नाही.