Mugdha Veira Godse gets Angry on Chaayos : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसेनं अभिनय क्षेत्रात स्वत: चं स्थान मिळवलं. मुग्धा तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली. यासगळ्याची माहिती मुग्धानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुग्धानं तिच्या आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुग्धानं चायोस या ब्रॅंडच्या कॅफेचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिनं कॅप्शन दिलं की "हे फार चूकिचं आहे. मुंबईच्या मालाड पश्चिम येथील इनऑर्बिट मॉलमधील चायोस या आऊटलेटच्या HRनं हे सगळं गांभीर्याने घ्यावं. काल माझी आई आणि मी शॉपिंग करुन थकल्यावर इथून चहा ऑर्डर केला. बाजुलाच असलेल्या एका दुकानातून मला एक वस्तू घ्यायची होती आणि म्हणून मी 5 मिनिटं आईला एकटीला तिथे सोडून गेले. मी जेव्हा परतले तेव्हा बघते तर काय माझी आई हातात त्या खूप जड अशा शॉपिंग बॅग घेऊन स्टोअरच्या बाहेर उभी होती. याविषयी माझ्या 70 वर्षांची असलेल्या आईला विचारताच तिनं सांगितलं की 6-7 मुलांचा एक ग्रुप आल्यानं स्टाफनं आईला सीटवरुन उठवलं होतं. त्यानंतर मी अगदी नम्रपणे ही गोष्ट चायोसची स्टोअर मॅनेजर दृष्टीच्या लक्षात आणून दिली. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे तिनं ही चूक स्वीकारलीच नाही. ज्या देशात जिथे मोठ्यांचा आदर केला जातो, त्याच देशात वृद्धांना अशी वागणूक मिळणं हे किती योग्य आहे? चायोसच्या सर्व्हिसवर आज मी खूप निराश झाले."



दरम्यान, मुग्धाची ही पोस्ट पाहताच त्यावर चायोसचा फाऊंडर नितिन सलूजानं हे ट्वीट पाहताच त्यावर रिप्लाय दिला आहे. "मुग्धा, हे फार चुकीचं आहे. तुझी आणि काकूंची माफी मागतो. आम्ही अशा कोणत्याही वागणुकीला समर्थन देत नाही किंवा त्याची पाठराखण करत नाही. हे प्रकार आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहोत." 



हेही वाचा : मुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय


मुग्धाविषयी बोलायचं झालं तर ती अभिनेता राहुल देवसोबत गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राहुल देव हा मुग्धापेक्षा वयानं 18 वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे त्याचं नात हे कायम चर्चेत असतं.