OMG! अंबानींच्या सुनेच्या हातातली पर्स इतकी महाग की, तुम्ही खरेदी कराल एक गुंठे जमीन
shloka mehta Purse: सर्वत्र चर्चा या आगळ्यावेगळ्या पर्सची...
Shloka Mehta Purse : (Reliance) रिलायन्स उद्योग समुहाला यशशिखरावर नेणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या कुटुंबाविषयीची कोणतीही माहिती सर्वसामान्यांना थक्क करते. सध्या याच कुटुंबातील सुनेनं म्हणजेच श्लोका मेहतानं सर्वांनाच तिच्या स्टाईल स्टेटमेंटनं थक्क केलं आहे.
एक पत्नी, आई, सून असण्यासोबतच श्लोका (Shloka) तिची अशी वेगळी ओळखही टिकवून आहे. सेलिब्रिटी वर्तुळात वावरणं असो किंवा मग व्यवसाय क्षेत्र आणि समाजहिताच्या कामात पुढाकार घेणं असो, श्लोका कायमच तिची छाप इतरांवर पाडून जाते.
हल्लीच तिचा 2019 मधील एक व्हिडीओ आणि काह फोटो व्हायरल होत आहेत. पती, आकाश अंबानी याच्यासोबत ती एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती. त्यावेळी तिच्या स्टायलिश लूकसोबतच नजरा खिळल्या त्या हातात असणाऱ्या क्रिस्टल पर्सवर.
श्लोकाच्या हातात तेव्हा दिसलेली पर्स 'जूडिथ लीबर' या ब्रँडची होती. 90 च्या दशकातील Boom Box या संकल्पनेवर आधारित ही पर्स श्लोकाच्या लूकला परिपूर्ण करत होती. बूमबॉक्स ब्रुकलिन मुकी पर्ससाठी श्लोकानं 5,995 युएस डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 4, 57,091 रुपये इतकी मोठी रक्कम मोजली होती.
तीन वर्षांपूर्वीच्या तिच्या या लूकची चर्चा आता होत असतानाच पर्सची किंमत अनेकांनाच हैराण करत आहे. काही सर्वसामान्यांनी तर, या पैशांत आम्ही एक गुंठा जमीन खरेदी करू अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, काहींनी ही लाखोंची रक्कम म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि इतर ठिकाणी गुंतवू असंही म्हटलं आहे.
असो, हा ज्याचात्याचा दृष्टीकोन. पण, श्लोकाच्या या पर्समुळे एक भन्नाट संकल्पना सर्वांनीच पाहिली हे नाकारता येणार नाही.