Isha Ambani चं सासऱ्यांसोबत कसं आहे नातं? त्या गिफ्टनेचं उलगडल्या भावना
आनंदसोबत लग्न केल्यानंतर ईशा अंबानी पिरामल कुटुंबाची सून बनली.
मुंबई : मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि केवळ भारतातच नाही तर ते संपूर्ण जगभरात त्यांचं मोठं नाव आहे. मुकेश अंबानी यांना आजच्या काळात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, अंबानी कुटुंब हे आशिया खंडातील सर्वात श्रींमत कुटुंब आहे. त्यांच्या घरापासून ते कार कलेक्शनपर्यंत प्रत्येक गोष्ट लोकांचं लक्ष वेधून घेणारी असते.
मुकेश अंबानीं आपल्या कुटुंबासह मुंबईतील महागड्या घरात अगदी आनंदात जीवन जगत आहेत. हेच कारण आहे की आजच्या काळात मुकेश अंबानी त्यांच्या जीवनशैलीमुळे नेहमीच सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतात. मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेच बिझनेस जगतात त्यांच्या लेकीचे ही मोठे नाव आहे. ईशा अंबानी सोशल मीडियावर देखील कमालीची चर्चेत असते.
ईशा अंबानीबद्दल सांगायचे तर, मुकेश अंबानींचा व्यवसाय वाढवण्यासाठी ती स्वतः खूप मदत करते आणि नुकतेच मुकेश अंबानी यांनी देखील त्यांच्या एका विधानात सांगितले होते की, त्यांच्यानंतर त्यांची मुलगी या संपत्तीमध्ये समान वाटेकरी असेल. सोबतच मुकेश अंबानी यांची मुलगी खूप हुशार आणि बिझनेस वुमन असल्याचं ही नेहमीच दिसून येतं..
त्यात अलीकडेच मुकेश अंबानींच्या लाडक्या मुलीला 500 कोटींहून अधिक किमतीचे घर गिफ्ट देण्यात आल्याची बातमी चर्चेत आली. सध्या ती या गिफ्टमुळे खूपच चर्चेत आहे.
मुकेश अंबानी यांच्या लाडक्या मुलीला लग्नानंतर हे घर गिफ्ट मिळाले आहे आणि हे घर इतर कोणीही नाही तर तिच्या सासऱ्यांनी दिल्याचं बोललं जात आहे. सध्या मुकेश अंबानींची लाडकी मुलगी या राजघराण्यात आपले आयुष्य जगत आहे. आनंदसोबत लग्न केल्यानंतर ईशा अंबानी पिरामल कुटुंबाची सून बनली.
ईशा अंबानी सध्या सासरी आहे. ईशा अंबानीचा पती एका प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा आहे. ईशा अंबानी ज्या घरामध्ये राहते ते घर तिला तिच्या सासरच्यांनी भेट म्हणून दिले होते, ज्याची किंमत 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ईशा अंबानी सध्या आपल्या पतीसोबत या घरात अतिशय आलिशान पद्धतीने आयुष्य जगत आहे.