मुंबई : अभिनेता महेश बाबू तुफान चर्चेत आला आहे. महेश बाबू आदिवी शेषच्या 'मेजर' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होता, जिथे तो त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलला. 'मला हिंदी सिनेमांच्या अनेक ऑफर येतात, पण बॉलिवूडला मी परवडणारा नाही. त्यामुळे मला माझा वेळ वाया घालवायचा नाही.' असं वादग्रस्त वक्तव्य महेशने सिनेमाच्या ट्रेलर लाँच दरम्यान केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश बाबूच्या वक्तव्यानंतर निर्माते मुकेश भट्ट यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीत भट्ट म्हणाले, 'जर बॉलिवूडला महेश बाबूची फी परवडणारी नसेल, तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा... महेश ज्या ठिकाणचा त्या ठिकाणचा मी आदर करतो...'



भट्ट पुढे म्हणाले, 'महेशकडे कौशल्य आहे. तो एक यशस्वी अभिनेता आहेय. त्यामुळे जर तो बॉलिवूडला परवडणारा नसेल, तर ठिक आहे. अशा अविर्भावात मुकेश भट्ट यांनी महेशबाबूला सुनावलं. 


'एखाद्या सिनेमासाठी 100 कोटींची मागणी केली तरी ती माझी निवड आहे. महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये निश्चित किंमत नाही. माझ्यासाठी अर्ध्या पैशात काम करणाऱ्या अभिनेत्यांसोबत मी काम केले आहे. 


'एखाद्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी कलाकार कमी फि घेतात. बॉलिवूडला मी परवडू शकत नाही...' असं म्हणण्यामागे देखील काही कारण असेल असं देखील मुकेश भट्ट म्हणाले.