Mukesh Khanna on Adipurush : सध्या 'आदिपुरुष' या चित्रपटावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. फक्त डायलॉग्स नाही तर चित्रपटाचे व्हिएफेक्स आणि राम, सीता त्यासोबत हनुमान यांच्या वेशभूषेवर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपटाचा हा वाद थांबायचं नाव घेत नाही. आता या चित्रपटावर 'शक्तिमान' फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी चित्रपट आणि चित्रपटाच्या स्टारकास्टवर अशा काही गोष्टी बोलल्या आहेत ज्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. खरंतर त्यांनी आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकण्याचा सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश खन्ना याआधी देखील या चित्रपटाविषयी अनेकदा बरंच काही बोललले आहेत. आता त्यांनी चक्क चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्टला जाळून टाकावे असे म्हटले आहे. नुकत्याच एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी 'आदिपुरुष' चित्रपटाच्या डायलॉग्सवर आक्षेप घेतला आणि या चित्रपटातून 'रामायणा'ची खिल्ली उडवली आहे, असे म्हटले आहे. इतकंच काय तर त्यांनी दावा केला की निर्मात्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला नाही. याचवेळी त्यांनी म्हटले की 50 डिग्री सेल्सियसचे खडे ठेवत त्या सगळ्यांना जाळून टाकले पाहिजे. मुकेश म्हणाले की "महादेवानं रावणाला आशीर्वाद दिला होता, याविषयी बऱ्याल लोकांना माहित नाही आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहात. त्यांना माफ करायला नको. काल मी माझ्या चॅनेलवर म्हणालो होतो की या संपूर्ण टीमला एकत्र उभं करून 50 डिग्री सेल्सियसमध्ये जाळायला हवं."


मुकेश खन्ना पुढे चित्रपटाचे दिग्दर्शनक ओम राऊत आणि डायलॉग राइटर मनोज मुंतशिर यांनी ज्या प्रकारे त्यांच्या या रामायणाच्या व्हर्जनवर वक्तव्य केलं, त्यांनी जे केलं ते योग्य आहे असं म्हण्यावर क्रोध व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना म्हणाले, "ला वाटतंय की आता या सगळ्या गोष्टी होत असताना हे लोक त्यांचं तोंड लपवतील पण ते तर पुढे येऊन या सगळ्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आम्ही हे सनातन धर्मासाठी बनवलं आहे. हा आहे तुमचा सनातन धर्म, आमच्या धर्मापेक्षा वेगळा? त्यांनी म्हटलं होतं की यात वाल्मीकि जी यांच व्हर्जन आहे आणि त्यासोबतच तुलसीदास जी यांचे देखील व्हर्जन असेल आणि हे आमचं व्हर्जन आहे."


हेही वाचा : अखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?


दरम्यान, 16 जून रोजी आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन यांनी राम आणि सीतेची भूमिका साकारली आहे. तर देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारली आहे. यासोबत सैफ अली खाननं रावणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतमीत 300 कोटींचा आकडा पार केला आहे.