Mukta Barve Travel By Best : मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मुक्ता ही गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मुक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मुक्तानं नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबईकरांच्या जीवनाच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बेस्ट विषयी मुक्ता बोलली आहे. मुक्तानं नुकताच बसनं प्रवास केला त्याचा फोटो तिनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणाली, 'जेव्हा रिक्षा आणि टॅक्सी मिळत नाही तेव्हा 'BEST' ही सगळ्यात महत्त्वाची ठरते.' (Mukta Barve Travelling By Public Tranport Says Best Is The Best In Mumbai) 



मोठया शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेकदा टॅक्सी रिक्षा हा पर्याय वापरला जातो. मात्र कित्येकदा हे चालक खूप जास्त भाडे आकारतात किंवा मग त्यांना जिथे आपल्याला जायचं आहे तेथे कसं जायचं हे माहित नसतं त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होते. मुंबईत असलेली बेस्ट ही सगळ्या कोपऱ्यात जाते. बऱ्याच वेळा आपण सेलिब्रिटींनी रिक्षानं प्रवास करताना पाहिलं आहे. आता मुक्ताला आपण बसनं प्रवास करताना पाहिलं. 


पाहा काय म्हणाले नेटकरी 


मुक्तानं शेअर केलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'ते पण पाच ते सहा रुपयांमध्ये.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मॅडम तुमचे पाय आजही जमिनीवरच आहेत, तुम्ही ग्रेट आहात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला तुझ्यात असलेला साधेपणा खूप आवडतो.' 


हेही वाचा : Aishwarya Rai नं Salman Khan मुळे दिला 'राम चाहे लीला' गाण्याला नकार!


हेही वाचा : दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटात मुक्ता दिसली होती. या चित्रपटात मुक्तासोबत श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होता. मुक्ता सगळ्यात शेवटी 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत दिसली होती. सध्या मुक्ता ही 'चारचौघी' या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. यासोबतच 'प्रिय भाई...एक कविता हवी आहे' चे प्रयोगही सुरु आहेत.