मुंबई : अभिनेता ऋषी कपूर, तापसी पन्नू, आशुतोष राणा, प्रतिक बब्बर, रजत कपूर आणि मनोज पाहवा अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या 'मुल्क' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 'मुल्क' ही एका अशा कुटुंबाची कहाणी आहे ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका दहशतवादी हल्ल्यातील आरोपी म्हणून एका मुस्लिम कुटुंबातील मुलाला (प्रतिक बब्बर) याला पोलिसांकडून अटक होते... त्यानंतर संपूर्ण कुटुंबावर केल्या जाणाऱ्या देशद्रोहाच्या आरोपाची ही कहाणी... 


तापसी पन्नू या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या एका वकिलाच्या भूमिकेत या सिनेमात दिसतेय... तर विरोधी पक्षाचा वकील वकील आहे आशुतोष राणा... 


हा सिनेमा येत्या ३ ऑगस्ट रोजी सिनेमाघरांत प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमध्ये ऋषी कपूर एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत... त्यांच्या या लूकची आणि अभिनयाचं सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच कौतुक सुरू झालंय.