अभिनेता सोनू सूदचं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात, पालिका कारवाई करणार का ?
अभिनेता सोनू सूद याचं मुंबईतल्या जुहूमधलं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात
मुंबई : अभिनेता सोनू सूद याचं मुंबईतल्या जुहूमधलं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. या हॉटेलवर हातोडा पडणार का आणि सोनू सूद वर गुन्हा दाखल होणार का ? असा प्रश्न निर्माण झालाय. जुहूमधल्या निवासी इमारतीत सोनू सूदनं हॉटेल सुरू केलंय.
यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर बीएमसीनं मुंबई पोलिसांत तक्रार दिलीये. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. सोनू सूदने आपल्याकडे महापालिकेची परवानगी असून महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं म्हटलंय.
याप्रकरणी पोलीस चौकशी करतायत. आता याबाबत पोलीस आणि मनपा प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्याचं लक्ष लागलंय.