...अन् रिक्षातून उतरल्यानंतर अक्षय कुमारने रिक्षावालीला दिले 10 हजार रुपये
Auto Driver Gets Rs 10000: तिला आधी आपल्या रिक्षामधून नेमकं कोण प्रवास करणार आहे याची काहीच कल्पना नव्हती मात्र जेव्हा तिने आपल्या या खास प्रवाशाला पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
Auto Driver Gets Rs 10000: ती नेहमीप्रमाणे रिक्षापर्यंत पोहचली मात्र ती पोहचण्याच्याआधीच तिच्या रिक्षात रिक्षा चक्क बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बसलेला असल्याचं दिसलं. काय बोलावं काय करावं तिला खरं तर सुचत नव्हतं. पण अक्षयनेच तिला कुठे जायचं आहे हे सांगितलं. तिला केवळ एक स्पेशल पाहुण्याला तुम्हाला सन एन सॅण्ड या हॉटेलमध्ये सोडायचं आहे इतकं सांगण्यात आलं होतं. अगदी शेवटच्या क्षणी तिला अक्षय कुमारला तुम्हाला ड्रॉप करायचं आहे. हे कळलं. सुरुवातीला तिला अक्षयला पिकअप करुन मग ड्रॉप करावं लागेल असं सांगण्यात आलेलं. मात्र ती रिक्षापर्यंत पोहण्याआधीच अक्षय तिथे पोहचून तिची वाट पाहत होता.
कोण आहे ही महिला?
आपण ज्या तिच्याबद्दल बोलतोय त्या महिलेचं नाव आहे छाया मोहिते! त्या मुंबईतील पहिल्या महिला रिक्षा चालक आहेत. अक्षय कुमारबरोबरची त्यांची भेट काही वर्षांपूर्वी झाली होती. नुकतीच छाया यांनी एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी अक्षयबरोबरच्या भेटीचा किस्सा सांगितला. "ते माझ्या रिक्षात बसले तेव्हा माझ्याशी गप्पा मारु लागले. मी त्यांना जुहूमध्ये फिरवलं आणि त्यांच्या घरी सोडलं," असं छाया या आठवणीबद्दल म्हणाल्या. या प्रवासादरम्यान माझी आणि पत्नी खरेदीसाठी गेल्याचं त्यांनी मला सांगितल्याचंही छाया म्हणाल्या. या भेटीसाठी छाया यांनी अक्षयचे आभार मानले. "अक्षय यांनी मी कधीही त्यांच्या भेटीसाठी येऊ शकते. अगदी कुटुंबाबरोबर आलात तरी आपली भेट होईल," असं सांगितल्याचं छाया सांगतात. मात्र त्यानंतर त्या कधीच अक्षयला भेटल्या नाहीत असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.
10 हजार रुपये दिले
अक्षयला छाया यांनी त्याच्या घराजवळ सोडल्यानंतर त्याने त्यांना रिक्षाचे पैसे म्हणून चक्क 10 हजार रुपये दिले. छाया करत असलेल्या कामाबद्दल वाटणारा आदर दर्शवण्यासाठी अक्षयने एवढे रुपये त्यांना देऊ केले. गृहिणी आणि त्या काळी पहिली महिला रिक्षाचालक म्हणून कमाईसंदर्भात संघर्ष करत असणाऱ्या छाया यांना या पैशांमुळे मोठा हातभार लागला होता.
तिचा का शोध घेत होता अक्षय?
खरं तर अक्षयने कुठेतरी मुंबईतील पहिली महिला रिक्षा चालक असा व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर आपण हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी अक्षयची इच्छा होती. त्यासाठी केवळ नाव आणि त्या व्हिडीओमधील स्क्रीनग्रॅबच्या आधारेच अक्षयची टीम जवळपास दोन महिने या महिलेचा शोध घेत होते. त्यांनी अनेक आरटीओ कार्यालयांशी संपर्क साधला होता. अखेर छाया यांचा पत्ता सापडला.
(फोटोत- छाया मोहिते आणि त्यांच्या सहकारी, सौजन्य - AFP/PUNIT PARANJPE)
आपण एका मुलाखतीसाठी आलो आहोत असं अक्षयच्या टीमने त्यांना सांगितलं. मात्र यामागील अक्षय कुमार कनेक्शनची छाया यांनी कल्पना देण्यात आलेली नव्हती. एक छोटी डॉक्युमेंट्री शूट करुन झाल्यानंतर अगदी शेवटी त्यांची आणि अक्षयची भेट घालून देण्यात आली जी आता आयुष्यभर छाया यांच्या स्मरणात राहणार आहे. याच भेटीच्या आठवणींना छाया यांनी नुकत्याच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत उजाळा दिला.