मुंबई : मुंबई... प्रत्येकाची स्वप्ननगरी. या मुंबईने साऱ्यांची स्वप्न पूर्ण केली. प्रत्येकाला हिम्मतीने जगण्याचे धडे दिले ते या मुंबईनेच. शहरं वसतातं असं म्हणतात, पण ही 'मुंबई' तर धावते. या "मुंबईचं स्पिरीट" म्हणतं सारेजणंच कौतुक करतात. पण ही 'मुंबई' थोडी थांबली. 'कोरोनाच्या महामारी'ने.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या काळात संपूर्ण 'मुंबई' ठप्प झाली. तब्बल साडे चार महिने कोरोनाने 'मुंबई'ला थांबवून ठेवलं. पण 'मुंबईचं स्पिरीट' काही थांबलं नाही. कोविड-१९ च्या काळात 'कोविड योद्धा' आपल्या प्रत्येकासाठी 'देवदूत'ठरले. 'कोविड' शी लढणाऱ्या योद्धांनी मुंबई आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवलं. आता आपली वेळ आहे त्या सर्वांच्या मदतीची परतफेड करण्याची. 



आता प्रत्येकाने आपली स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची सगळ्यांची काळजी घ्यायला हवी. कोरोनाच्या काळात लागू झालेले सगळे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत. आपली काळजी घेऊन आपण कोविड योद्धांवरचा भार कमी करायला हवा. कारण 'आता आकाश उघडलंय, उद्या मुंबई उघडेल'. 


हा व्हिडओ 'भाडीपा' ने तयार केला असून या व्हिडिओचं लेखन, दिग्दर्शन पार्थिवा नागने केलं असून यातील संवाद हे सारंग साठे, पुष्कर बेंद्रे आणि सावनी वझेने लिहिले आहेत. या व्हिडिओ उत्तम ऍनिमेशन वापरण्यात आलंय ते शारण्या मेनन, सलोनी बसरूर यांनी केलं आहे. या व्हिडिओचं संपूर्ण नरेशन सारंग साठेने केलं आहे.