COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : 'रेस ३'   बॉलीवुडच्या अशा सिनेमांपैकी एक आहे ज्याची चाहते बराच काळ वाट पाहत आहेत.  'अवर बिझनेस इज अवर बिझनेस इट्स नन ऑफ युअर बिझनेस' अशा 'रेस ३'मध्ये डेझी शाहचा एक डायलॉग आहे. या ट्रेलरमधील डायलॉग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मुंबई पोलिसांच्या ऑलाईन डेटा सेफ्टीनेही 'रेस ३' च्या या डायलॉगचा आधार घेत संदेश दिलाय.



युट्यूबवर नंबर १ 


सिनेमाच्या ट्रेलरनेच हंगामा केलाय. गेले ३ दिवस हा ट्रेलर युट्यूबवर धुमाकूळ घालत सलग १ नंबरवर आहे. जेवढ या ट्रेलरच कौतुक होतय तेवढच याची खिल्लीही उडवली जातेय.  सलमानच्या हातून रॉकेट लॉन्च करण्यापासून ते उडत्या बाइकवर बॅक फ्लिप मारणाऱ्या बॉबी देओल पर्यंत सर्वच सोशल मीडियावर हास्याचा विषय बनले आहेत. या ट्रेलरमध्ये एका डायलॉगमुळे अभिनेत्री डेझी शाह ट्रोल झाली आहे. डेझी या डायलॉगची स्वत: सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिसनेही खिल्ली उडविली आहे.