Amitabh Bachchan, अनुष्का शर्मा यांना बाईक राईड पडणार महागात, पोलिसांकडून होणार कारवाई
Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बाईकवरुन शूटिंगला पोहोचल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र हीच बाईक राइड या दोघांना महागात पडणार आहे.
Amitabh Bachchan and Anushka Sharma: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. वयाची 80 वर्ष पूर्ण झाली तरी यांच्यातील उत्साह हा कमी झाला नाही. अमिताभ बच्चन हे अजूनही वेळेचे कठोर पालन करण्यासाठी ओळखले जातात. इंडस्ट्रीतील सर्वात दिग्गज कलाकार असूनही ते कधीही सेटवर उशिरापर्यंत पोहोचत नाहीत. जेव्हा जेव्हा त्यांना कार्यक्रमासाठी बोलावले जाते तेव्हा ते दिलेल्या वेळेत पोहोचतात. 'प्रोजेक्ट के' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापतीतून ते नुकतेच बरे झाले आणि त्यांनी शूटिंगही सुरू केलं.
या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी आणि अनुष्का शर्माने ( Anushka Sharma) फॅनकडून लिफ्ट मागतील. त्यानंतर त्यांचा बाईक राईडचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मात्र याप्रकरणी आता मुंबई पोलिस बिग बी आणि अनुष्का शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत...
सोमवारी शूटला पोहोचण्यासाठी अमिताभ यांनी एका फॅनकडून लिफ्ट घेतली. तर, अनुष्का शर्मा तिच्या बॉडीगार्डसोबत रस्त्यावर बाईक चालवताना दिसली. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दोघांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळेच या दोन्ही कलाकारांवर टीका होत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, 'राइडसाठी धन्यवाद.. मी तुम्हाला ओळखत नाही.. पण तुम्ही मला वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचवले. मला ट्रॅफिक जॅमपासून वाचवल्याबद्दल धन्यवाद....
त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनी टॅग करत एका चाहत्याने म्हटले की, बाईकस्वार आणि मागील दुचाकीस्वार दोघांचेही हेल्मेट घातले नाही. @MumbaiPolice कृपया लक्ष द्या. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रीया दिली असून आम्ही हे वाहतूक पोलिसांशी शेअर केले आहे, असे लिहिले आहे.
यासोबतच अनुष्का शर्माचा एक व्हिडिओही मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आला असून त्यावर @Mumbai Police no helmet असे लिहिले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी ट्विटरवर उत्तर दिले. या दोन्ही प्रकरणांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.