COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बहुचर्चित मुंबई पुणे मुंबईच्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर लाँच झाला आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई आणि मुंबई पुणे मुंबई 2 या सिनेमांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आता मुंबई पुणे मुंबई 3 चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 


या तिसऱ्या भागातही महाराष्ट्राची लाडकी जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशी या सिनेमात पुण्याची गौतमची भूमिका साकारत आहे तर मुक्ता बर्वे मुंबईतील गौरीची भूमिका साकारत आहे. 


तिसऱ्या भागात गौरी आणि गौतमची कथा पुढे सरकरली आहे. आता गौरी आणि गौतमी एक नवी जबाबदारी स्विकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या संसारावर एक सुंदर फूल उमलणार आहे. हीच गम्मत आता या सिनेमात पाहायला मिळमार आहे. 


करिअरला प्राधान्य देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात एकच गडबड गोंधळ सुरू होतो, अशी साधारण हलकीफुलकी कहाणी ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’मध्ये पाहायला मिळणार आहे.