मुंबईचे कलाकार `America`s Got Talent`च्या मंचावर
वी अनबीटेबल` ग्रुप आपल्या नृत्याची सुरूवात `गणपती बाप्पा मोरया` या जयघोषाने करतात.
मुंबई : संपूर्ण जगात आता नृत्य कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. मुंबईच्या 'वी अनबीटेबल' या ग्रुपने अमेरिकेच्या America's Got Talent या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. २८ मे रोजी शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्याआधीच मुंबच्या स्ट्रीट डान्सर्सने इन्टरनेवर त्यांचा नृत्य आविष्कार सादर केला. त्यांच्या सादरीकरणानंतर परिक्षकांनीही त्यांचे कौतुक केले. डान्स शो सुरू होण्याआधीच या नृत्यप्रेमींनी आपल्या कलेचा आविष्कार सोशल मीडियावर पोस्ट केला.
त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. America's Got Talent या शोमध्ये आमचे कौशल्य सादर करणे, हे एका मोठ्या स्वप्ना प्रमाणे आहे. आम्ही हा शो युट्यूबवर नेहमी बघायचो. आता आमचे स्वप्न सत्यात उतरत आहे , त्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत. असे वक्तव्य टीमने केले.
हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही शुभ काम गणपती बाप्पाच्या नावाने सुरू होते. त्याचप्रमाणे 'वी अनबीटेबल' ग्रुप आपल्या नृत्याची सुरूवात 'गणपती बाप्पा मोरया' या जयघोषाने करतात. या ग्रुपमध्ये १२ ते २७ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.