मुंबई : आताच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. फक्त सर्व सामान्य जनता नव्हे तर सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. दरम्यान हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट होफमन सध्या चांगलाचं चर्चेत आहे. मुंबईतील एका लहान मुलीसोबत त्याने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यामुळे मुंबईतील एक सामान्य मुलगी रातोरात स्टार झाली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलीचं नाव मलिशा खारवा असं आहे. रॉबर्ट त्याच्या म्यूझिक अल्बमंच्या निमित्ताने मुंबईत आला. या प्रवासादरम्यान त्याची भेट मलिशासोबत झाली. गरीब वस्तीत राहणाऱ्या या लहान मुलीचं इंग्रजी ऐकून तो फार प्रभावित झाला. या व्हिडिओमध्ये तो मलिशासोबत  गंमतीशीर मस्ती करताना दिसत आहे. 


‘स्टेप अप द स्ट्रीट’, ‘कोट कार्टर’, ‘डान्स अॅकेडमी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. हॉलिवूडमधील नामांकित अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे.