Munawar Faruqui ची एक झलक पाहण्यासाठी मुंब्य्रात तुडूंब गर्दी! पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
Munawar Faruqui: मुनाव्वर फारुकीच्या या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून पोलिसांनी त्यानंतर लाठी चार्ज केला आहे.
Munawar Faruqui: स्टॅन्डअप कॉमेडियन आणि 'बिग बॉस 17' चा विजेता मुनाव्वर फारुकीनं गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शो संपल्यानंतर तो सतत कोणत्या ना कोणताया पार्टीत किंवा कार्यक्रमात दिसतोय. मुंबईच्या ठाण्यात एका कार्यक्रमात तिनं हजेरी लावली होती. त्यावेळी पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांनी त्याच्या अवतीभोवती गर्दी केली. कसा तरी तो स्टेजवर पोहोचला मात्र, पोलिसांनी त्याच्या चाहत्यांवर लाठीचार्ज केला. अनेकांचे या कार्यक्रमात फोनही चोरीला गेले.
मुनाव्वर फारुकीनं नुकतीच एनसीपी शदर पवार यांच्या गटातील जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा कार्यक्रम ठाण्यातील मुंब्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मुनाव्वरला आपल्यासमोर पाहून त्याचे चाहते उत्सुक झाले होते. त्याला जवळून पाहण्यासाठी आणि त्याला एकदा स्पर्शकरून पाहण्याचा सगळेच प्रयत्न करत होते. पोलिसांकडून ही गर्दी सांभाळणं कठीण झाल्यानं त्यांनी लाठीचार्ज केल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांचा माइकवर ओरडत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ते म्हणतायत की मी त्याचा भाऊ आहे, मी त्याचा भाऊ आहे म्हणतं सगळेच वर येत आहेत. तर सगळ्यांनाच वर घेऊ का? त्यावरून त्यांच्यात आणि तिथे असलेल्या काही लोकांमध्ये वाद सुरु असल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : "एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही अन्..."; म्हणत रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा!
यावेळी स्टेजवर मुनाव्वरनं तिथे उपस्थित असलेल्या लोकांना नशा करण्यापासून दूर राहण्यास सांगितले. त्यानं म्हटलं की ती खूप वाईट सवय आहे. त्यानं तुमचं चांगलं होणार नसून वाईटचं होणार आहे. त्याशिवाय त्यानं जर कधी इच्छा झाली तर आई, वडील आणि बहिणीला आठवा असं देखील सांगितलं.