`मुंज्या`च्या `या` अभिनेत्यानं कास्टिंग काउचचा सामना केल्यानंतर सोडलं होतं बॉलिवूड! हरियाणाला गेल्यानंतर एक दिवस...
Munjya Fame Actor : `मुंज्या` फेम अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे.
Abhay Verma : बॉलिवूड अभिनेता अभय वर्मानं मुंज्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभयनं नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यानं मुंबईत स्वत: चं स्थान निर्माण करण्यासाठी आला तेव्हा त्याच्यासोबत काय झालं याचा खुलासा केला. त्यावेळी अभयनं खुलासा केला की एकदा तो कोणत्या मीटिंगसाठी गेला होता तेव्हा कास्टिंग काउचचा शिकार झाला होता. या घटनेचा त्याच्यावर इतका परिणाम झाला की तो मुंबईहून हरियाणाला परत गेला. खरंतर, त्यानंतर त्याला ही जाणीव झाली की दुसरं कोणी त्याला त्याचा प्रवास सांगू शकत नाही आणि हाच विचार करून तो मुंबईत परत आला.
अभय वर्मानं 'इन्स्टंट बॉलिवूड'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'मी कधीच त्या पॉइंटला पोहोचलो नव्हतो, जिथे मला कोणाला नाही बोलण्याची वेळ आली नाही पाहिजे. खरंतर, एकदा असं झालं होतं. माझी मुंबईतली मीटिंग ही काही इतकी चांगली नव्हती. लोकांना आयुष्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत. अभयनं सांगितलं की त्यानं कॉम्प्रोमाइज करण्यासाठी नकार दिला होता आणि आपल्या घरी पाणीपत, हरियाणाला परतलो.' अभयचं म्हणणं आहे की त्यावेळी तो खूप निरागस होता, अशात त्याला काही कळत नव्हतं.
अभयनं सांगितलं की त्यानंतर पुढे सांगितलं की त्या घटनेनंतर तो एक स्टॉंग व्यक्ती म्हणून समोर आला, 'मला वाटलं की मी माझ्या टिव्हीचा रिमोट दुसऱ्या लोकांना का देऊ आणि त्यांनी का म्हणून चॅनल बदलावं. हा माझा प्रवास आहे आणि त्यावर कोणाचा हक्क नाही. त्यानंतर मी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत आलो आणि त्यानंतर मला माझ्यात बदल झाल्याचं जाणवलं. मी एका वेगळ्या ताकदीनं मुंबईत परतलो होतो.
अभयला पुढे विचारण्यात आलं की काय तो कधी खोट्या फोटोशूटच्या चक्करमध्ये अडकला आहे का? त्याचं उत्तर देत त्यानं सांगितलं की असं मुंबईत अनेकदा होतं. काही लोकं सांगतात की तुम्ही आम्हाला फीस द्या आणि पुढचा रोल तुम्हालाच मिळणार. मात्र, मला या गोष्टीची जाणीव झाली की असं काही होणार नसतं. तुम्ही किती टॅलेंटेड आहात त्यावर हे अवलंबून असतं. कोणी व्यक्ती तुम्हाला कितीही भूमिका देऊ द्या. पण मी असे शॉर्टकट घेण्याचा विचार कधी केला नव्हता. मला एकएक स्टेप पुढे घेण्यात विश्वास आहे.
हेही वाचा : गोविंदाला अचानक गोळी लागलीच कशी? यात काही कट नाही ना? शत्रुघ्न सिन्हा स्पष्टच बोलले…
अभय वर्माच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या सफेद या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटात अभयनं एक ट्रान्सजेंडरची म्हणजेच तृतीयपंथीची भूमिका साकारली होती.