मुंबई : घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या 'मुरांबा'नं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगलेला असतानादेखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 'मुरांबा'चे शो हाउसफुल झालेले दिसले. हा चित्रपट बघताना खूप काळानंतर एक गोड, कौटुंबिक चित्रपट बघितल्याचे समाधान मिळत आहे... आणि आता परदेशातील नागरिकांनादेखील हा गोड, कौटुंबिक सिनेमा अनुभवण्याचा आनंद घेता येणार आहे.


ऑस्ट्रेलिया, स्वीडन येथील हाऊसफुल शो नंतर 'मुरांबा' येत्या ११ जून रोजी अमेरिका येथे प्रदर्शित होणार आहे. अमेरिकेमधील एकूण १० शहरांमध्ये या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे.


दशमी क्रिएशन्सचे मुख्य आणि चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांच्या अप्रतिम मार्केटिंग आणि वितरणाच्या नियोजनामुळे 'मुरांबा' परदेशातदेखील पोहोचत आहे.


अमेय वाघ, मिथिला पालकर, सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. खुसखुशीत संवाद, फ्रेश लूक, साधी, सरळ आणि तितकीच गोड अशी पटकथा यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात 'मुरांबा' यशस्वी झाला आहे.