मुंबई : दोन दशकांपासून सिनेसृष्टीत काम करत असलेल्या अभिनेता मुरली शर्मावर मातृशोक कोसळला आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी पद्मा शर्मा यांच कार्डिएक अरेस्टने निधन झालं आहे. DNA ने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आईचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. मुरली यांचे वडिल ब्रजभूषण शर्मा यांच गेल्या वर्षी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरली जवळपास दोन दशके हिंदी सिनेजगतात काम करत आहेत. 'मैं हूं ना', 'अपहरण'धमाल', 'ढोल', 'जाने तू हां जाने ना', 'दबंग', 'ओएमजी: ओ माय गॉड', 'बेबी', 'बदलापुर', 'एबीसीडी 2', 'साहो' आणि 'स्ट्रीट डांसर 3 डी' या सिनेमांत अभिनय केला आहे. मुरली यांनी 'रविवार', 'गोलमाल रिटर्न्स', 'गोलमाल 3', 'सिंघम' और 'गोलमाल अगेन' सारख्या सिनेमांमधून रोहित शेट्टीसोबत काम केलं आहे. 


तसेच दक्षिण सिनेमात अथिदी, कांतरी, ओसरवेली, धोनी, मिस्टर नुकेय्या, अधिनायकुडु, कृष्णम वंदे जगदगुरुम, अर्रम्बम, येवदु, अंजान, कृष्णागाड़ी वीरा प्रेमा गाढ़ा, हाइपर आणि दुव्वादा जगन्नाथ सिनेमांत काम केलंय. मुरलीने २००९ मध्ये अश्विनी कालसेकरसोबत लग्न केलं आहे. 



अश्विनी यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी यांनी अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, त्यांच आणि त्यांच्या सासुचं खूप चांगलं नातं आहे.