...म्हणून सुरेश वाडकरांनी `रंगीला` चित्रपटानंतर ए आर रहमानसोबत कधीच कामच केलं नाही
सुरेश वाडकर यांनी ए आर रहमानसह झालेली पहिली भेट आणि नंतर त्याच्यात झालेला बदल याबद्दल सांगितलं आहे. तसंच आपण `रंगीला` सारखा सुपरहिट चित्रपट करुनही पुन्हा एकत्र काम का केलं नाही याचा खुलासा केला आहे.
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी गायली आहे. भक्तीगीतांपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक गाणी त्यांनी अजरामर केली आहेत. 'ए जिंदगी गले लगाले', 'सपने मै मिलती है' अशी त्यांची सुपरहिट गाणी आजही तितकीच प्रसिद्ध असून, अनेक ठिकाणी ऐकण्यास मिळतात. सुरेश वाडकर यांनी अनेक दिग्गजांसह काम केलं आहे. रंगीला या सुपरहिट चित्रपटात सुरेश वाडकर यांनी दिग्गज संगीतकार ए आर रहमानसह काम केलं होतं. पण या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा झळकली नाही. सुरेश वाडकर यांनी एका मुलाखतीत यामागील कारणाचा उलगडा केला होता.
एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान या दोन दिग्गजांमध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्याआधी रंगीला चित्रपटात सुरेश वाडकर यांनी 'प्यार ये जाने कैसा है' गाणं गायलं होतं. हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. पण यानंतर सुरेश वाडकर आणि ए आर रहमान यांच्यात दुरावा झाला. सुरेश वाडकर यांनी राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय झालं होतं याचा खुलासा केला होता.
रोजा चित्रपट अनेक भाषात डब करण्यात आला होता. मराठीतील सर्व गाणी ए आर रहमान यांनी गायली होती. 'रोजा' हिट झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी एर आर रहमान यांच्याबद्दल समजलं. पण जेव्हा मद्रासच्या स्टुडिओत त्यांनी ए आर रहमानला पाहिलं तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. सुरेश वाडकर म्हणाले की, "कित्येक वर्षांपूर्वी मी ए आर रहमानला भेटलो होतो तेव्हा दिलीप नावाने ओळखत होतो. रोजा हिट झाल्यानंतर मला ए आर रहमान नावाचा संगीतकार आल्याचं समजलं. तोपर्यंत मला दिलीपच ए आर रहमान आहे हे माहिती नव्हतं".
"मला एक दिवस मद्रासहून फोन आला. मी तोपर्यंत ए आर रहमान हे नाव ऐकलं होतं. रोजा चित्रपटामुळे या नावाची ओळख झाली होती. फोनवर मला रहमान साहेबांनी गाणं गाण्यासाठी बोलावलं असल्याचं सांगण्यात आलं. मी त्याप्रमाणे गेलो होतो. तोपर्यंत मला त्याच्या रोजच्या दिनचर्येची काही कल्पना नव्हती. दुपारी तो झोपून उठायचा. पण ती त्याची पद्धत झाली होती. दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 3 -4 वाजेपर्यंत ते सगळे काम करतात," अशी माहिती सुरेश वाडकर यांनी दिली.
ए आर रहमान येताच सुरेश वाडकर यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी दिलीप हाक मारली. त्यावर त्यांना गीतकार मेहबूब यांनी रोखलं आणि ते रहमान साहेब आहेत असं सांगण्यात आलं. तेव्हा मला समजलं की दिलीपने इस्लाम स्विकारला आहे. माझ्यासाठी ही धक्कादायक बाब होती. पण माझ्यासाठी दिलीपच रहमान आहे. त्याने मला 'प्यार ये जाने कैसा है' गाणं ऐकवलं. मला हे गाणं आवडलं आणि आनंदी झालो. आम्ही गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर खूप गप्पा मारल्या. ए आर रहमानलाही आनंद झाला होता. लोकांनाही हे गाणं आवडलं होतं असं सुऱेश वाडकरांनी सांगितलं.
"त्यानंतर त्यांनी मला आणखी एक गाणं गाण्यासाठी बोलावलं होतं. या गाण्याची रेकॉर्डिंग त्यांच्या असिस्टंटने केली होती. गाणं रेकॉर्ड केल्यानंतर मी आणि साधना सरगम हॉटेलला पोहोचलो होत. त्यानंतर ए आर रहमान स्टुडिओत आला. त्याला गाण्यात काही बदल हवे होते. यावरुन आमच्यात वाद झाला. गाणं रेकॉर्ड होत असताना ते स्वत: उपस्थित हवेत. पण त्या घटनेनंतर ना त्यांनी मला बोलावलं, ना मी कधी त्याच्यासह काम केलं," अशी माहिती सुरेश वाडकरांनी दिली.
पण या वादानंतरही सुरेश वाडकर यांनी ए आर रहमानला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केलं. "तो फार हुशार आहे. चांगला काम करत असून, आम्हाला गर्व आहे. त्याच्यामुळे भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळाला. यासाठी मी त्याचं अभिनंदन करतो. पण त्याच्या कामाची पद्धत मला आवडलेली नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.