मुंबई : 2001मध्ये अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'तुम बिन' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाच्या कथेपेक्षा या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी जास्त प्रेम दिलं. विशेषत: चित्रपटातील 'कोई फरियाद' हे गाणं सर्वांच्या मनाला भिडलं. हे गाणं त्यावेळी प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये होतं आणि लोकही अजुनही हे सुपरहिट गाणं पसंत करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्याने गायक जगजितसिंग यांच्या कारकिर्दीला एक नवं वळण दिलं. अनुभव सिन्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने खुलासा केला आहे की, हे गाणं लिहिणारे गीतकार फैज अनवर यांना या गाण्याचे बोल पटवून देण्यासाठी अनुभव सिन्हा यांना प्रभावित करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी  लागली होती.


एका मुलाखतीमध्ये बोलताना अनुभव यांनी या गाण्यासंबधित एक खुलासा केला आहे. की, फैज अनवर एक शायर होते आणि तेव्हाच त्यांनी गाणंही लिहायला सुरुवात केली होती. अशामध्ये अनुभव यांना वाटायचं की, त्यांनी 'तुम बिन' या सिनेमासाठी एक गाणं लिहावं. ज्यामध्ये एखादा शेर देखील असावा. फैज जेव्हा या गाण्यासाठी तयार झाले त्यावेळी या गाण्यात सामिल असलेला शेर अनुभव यांनी जवळजवळ ८१वेळा रिजेक्ट केला होता.


तसंच त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते एका शूटिंगमध्ये होते तेव्हा त्यांना फैज यांचा फोन आला आणि त्यांनी ''एक लम्हे में सिमट आया सदियों का सफर… जिंदगी तेज बहुत बहुत तेज चली हो जैसी'' ही ओळ ऐकवली आणि अनुभव त्वरित सहमत झाले. अशा परिस्थितीत फैज हसले आणि म्हणाले की, त्यांनी माझे ८१  शेर रिजेक्ट केले आहेत आणि ८२वा शेर त्यांनी फायनल केला आहे.


इतकंच नव्हे तर जेव्हा या गाण्याचं म्युझिक कंपोजर निखिल सामथ यांना या गाण्याला एक मॉर्डन टच द्यायचा होता. तेव्हा जगजितसिंग त्यांच्यावर नाराज  झाले आणि डबिंग स्टुडिओमधून परत आले कारण ते या गाण्याच्या संगीतावर नाराज होते. पण अनुभव सिन्हा यांना अशी इच्छा होती की, जगजितसिंगांपेक्षा या गझलसाठी दुसरा आवाज कोणाचा नसेल, म्हणून जगजितसिंग यांना हे गाणं करण्यास मनवलं गेलं. आणि तेव्हा कुठे जावून ९ मिनीटांची आणि हृद्याला भिडेल अशी गजल लोकांच्या मध्ये आली आणि हे एक सुपरहिट ट्रॅक बनलं. २०१६ मध्ये तुम बिन सिनेमाचा सिक्वल आला पण हा सिनेमा फ्लॉप झाला.