मुंबई : नटरंग या चित्रपटाने लावणी या नृत्यप्रकाराला पुन्हा ट्रेन्डमध्ये आणलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नटरंग चित्रपटातील 'अप्सरा आली' ही लावणी अनेक कार्यक्रमांमध्ये सादर झालेली सुपरहीट लावणींपैकी एक आहे. पण 'सुपर डान्सर' या रिएलिटी शो मध्ये रोबोटिक अंदाजावर ही लावणी सादर करण्यात आली आहे. 


'सुपर डान्सर' हा सोनी टीव्हीवरील डान्स रिएलिटी शो आहे. यामध्ये मुस्कान या चिमुरड्या स्पर्धकाने रोबोट्च्या अंदाजामध्ये ' अप्सरा आली'... वर अप्रतिम नृत्य सादर केलं आहे. 



 


मुस्कानच्या जोडीला पॉल देखील होते. गाण्याच्या वेगाला जुळवून घेत रोबोटिक अंदाजातील दोघांचेही हावभाव थक्क करणारे होते. या नृत्याला रसिकांप्रमाणेच परिक्षकांचीही दाद मिळाली. 


सुपर डान्सर  या शोचे परिक्षण कोरिओग्राफर गीता कपूर,अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि दिग्दर्शक अनुराग बासू करत आहेत. 


मुस्कानच्या  ४ मिनिटांच्या नृत्याला सार्‍यांनीच दाद दिली. तिन्ही परीक्षकांनी मुस्कानला डांस सुरू असतानाच स्टॅन्डिंग अवेशन दिले आहे. 


नटारंग चित्रपटातील 'अप्सरा आली..' ही मूळ लावणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर चित्रित करण्यात आली आहे. तर गायिका बेला शेंडेने या गाण्यासाठी पार्श्वगायन केले आहे.