मुंबई : राजवाडे अॅण्ड सन्स फेम अभिनेत्री कृतिका देव 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अभिषेक देशमुखसोहत कृतिकाने 6 जानेवारी लग्न केलं. त्या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कृतिकाने बॉयफ्रेंड आणि अभिनेता अभिषेक देशमुखसोबत कृतिकाने रजिस्टर मॅरेज केले आहे. लग्नाचा जास्त गाजावाज न करता मोजक्याच नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 


लग्न 6 जानेवारी रोजी पार पडले आहे पण कृतिका आणि अभिषेकने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली होती. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. तसेच या व्हिडिओमध्ये नववधू कृतिकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. 



कृतिकाने 'राजवाडे अॅण्ड सन्स', 'हॅपी जर्नी' आणि 'हवाईजादा' यांसारख्या  सिनेमात काम केले असून 'प्रेम हे'मालिकेच्या सिरीजमध्ये या प्रथमेश परबसोबत काम होते केले.यात त्या दोघांची लहानवयात असणारी प्रेमकथा दाखवण्यात आली होती.तसेच अभिषेकही व्यवसायाने अभिनेता,दिग्दर्शक तसेच लेखकही म्हणून काम करतो.अभिषेकने 'पसंत आहे मुलगी' या मालिकेत पुनर्वसूची भूमिका साकारली होती.