बॉलीवूडची ही अभिनेत्री म्हणतेय, आमच्यावेळी बॉयफ्रेन्ड व्हर्जिन असत...
अभिनेत्री पूजा बेदी आता बॉलिवूडपासून दूर असली, तरी मुलगी अलाया फर्निचरवालामुळे ती चर्चेत असते.
मुंबई : अभिनेत्री पूजा बेदी आता बॉलिवूडपासून दूर असली, तरी मुलगी अलाया फर्निचरवालामुळे ती चर्चेत असते. अलाया देखील आता एक बॉलिवूड स्टार आहे. अलाया 'जवानी जानेमन' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडकडे वळली. स्टार असल्यामुळे तिची चर्चा तर होणारचं. अलाया चर्चेत असते पण तिच्या रिलेशनशीपमुळे. आता अलायाची आई म्हणजे पूजा बेदीला तिच्या मुलीच्या नात्याबद्दल काय वाटतं? याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ऐश्वर्य ठाकरे आणि अलया एकमेकांना डेट करत असल्याचं कळत आहे.
यावर पूजा म्हणाली, 'माझ्या वेळेस गोष्टी वेगळ्या होत्या. माझ्यावेळी बॉयफ्रेन्ड नसणं, व्हर्जिन असणं, अविवाहित असणं अत्यंत गरजेचं होतं. आज प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीने जगण्याचा हक्क आहे. आज प्रत्येकाची एक पर्सनल लाईफ आहे.' शिवाय यावेळी पूजाने अभिनेत्री करीना कपूर खानचं देखील उदाहरण दिलं.
करीनाचं उदाहरण देत पूजा म्हणाली, 'लग्न आणि दोन मुलं झाल्यानंतरही करीना बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झाला आहे. शिवाय प्रेक्षकांची मानसिकता बदलल्यामुळे या सर्व गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. हे बदल सोशल मीडियामुळे झाले आहेत.' असं म्हणत पूजाने सोशल मीडियाचे देखील आभार मानले.
ऐश्वर्य ठाकरे बद्दल सांगायचं झालं तर तो बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्यचा वाढदिवस दुबईत साजरा करण्यात आला होता. तेव्हा अलाया देखील त्याठिकाणी उपस्थित होती. त्याचं दिवसानंतर ऐश्वर्य आणि अलायाच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या.