मुंबई :  'नाचेंगे सारी रात...' फेम गायक तरसेम सिंह सैनी  म्हणजेच ​​'ताज' याने या जगाचा निरोप घेतलाय. यूके स्थित भारतीय गायक तरसेमचं 29 एप्रिल रोजी वयाच्या 54 व्या वर्षी लंडन येथे निधन झालं, तो मागील 2 वर्षांपासून हर्नियाने त्रस्त होता. रुग्णालयात दाखल करताना तो कोमात गेला आणि गेल्या महिन्यात त्याची प्रकृतीही ढासळू लागली. तरसेमच्या निधनाने चित्रपट आणि संगीत विश्वात शोककळा पसरली असून सोशल मीडियावर लोकं त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताजने  80 च्या दशकात क्रॉस-कल्चरल आशियाई संगीताने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या गायकाने हिट द डेक या गाण्याने आपल्या गायनाची कारकीर्द सुरू केली आणि त्यानंतर तो प्रसिद्धी झोतात आला. ताजला 'जॉनी झी' या नावानेही ओळखलं जातं आणि 'नाचेंगे सारी रात, गल्लन गोरियां आणि प्यार हो गया' सारख्या गाण्यांसाठी तो ओळखला जातो.



मिका सिंगची भावुक पोस्ट
90 च्या दशकात स्टिरीओ नेशन बँडचा मुख्य गायक असलेल्या तरसेमने ध्वनी भानुशालीसोबत 'कोई मिल गया', 'तुम बिन' आणि अलीकडेच 'बाटला हाऊस'मधील गलन गोरियांसारख्या गाण्यांना आवाज दिला. त्याच्या निधनानंतर जगभरातील लोकांनी या पॉप सिंगरला श्रद्धांजली वाहिली. गायक मिका सिंगने इंस्टाग्रामवर लिहिलेल्या नोटमध्ये, 'ताज स्टिरिओ नेशनने आपल्या सुंदर आठवणींसोबत दुःखात सोडलं आहे. त्याला नुकतंच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि दुर्दैवाने तो कोमात गेला होता. मी त्याची लाल लाल बुलियन, नाचंगे सारी रात तसंच इतर हिट गाणी ऐकत मोठा झालो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.''