मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा या प्रसंगी अडचणीत सापडलेल्यांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या पोलीस खात्याची अतिशय वेगवान सेवा पुन्हा एकहा पाहण्याची संधी मिळाली आहे. यावेळी पोलीस चक्क, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत असणाऱ्या अनुष्काच्या मदतीला येत थेट नागपूर पोलिसांनी एक ट्विटही केलं आहे. गरज असल्यास आम्ही महाराष्ट्र राज्यातील वनविभागाला सांगून तुझ्या मदतीसाठी पाठवू का, असा थेट प्रश्नच त्यांनी तिला केला आहे. बरं, त्यांच्या या मदतीने अनुष्काचा पती, क्रिकेटपटू विराट कोहली अडचणीत येऊ शकतो. कारण, प्रकरणच तसं आहे.  


शॉल्लेट! मुंबई पोलिसांना निवेदिता- अशोक सराफ यांचा गोड सलाम


 


पोलीस खात्याकडून अनुष्काला ही मदत करण्यास कारणीभूत ठरला आहे तो म्हणजे एक व्हिडिओ. बी- टाऊनच्या या अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या घरात डायनासोर शिरल्याचं सांगितलं होतं. 



वाचा : 'इन्सानोंको कोरोना होता है, कोरोना इन्सान नही होता'


अनुष्काच्या घरात शिरलेला हा डायनासोर म्हणजे दुसरा- तिसरा कोणी नसून, तिचा पती विराट कोहलीच होता. अतिशय विनोदी अंदाजात तिने हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. जो सोशल मीडियावर विशेष गाजला. बरं, इतका गाजला की आता खरंच अनुष्काच्या मदतीसाठी पोलीस आणि वनविभाग सरसावल्याचंही चित्र पाहायला मिळालं. तणावाच्या परिस्थितीमध्ये सेलिब्रिटी जोडी आणि पोलिसांमधील हा सोशल संवाद नक्कीच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणून गेलं असणार यात शंका नाही.