COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : नागराज मंजुळे आणि उत्तम कलाकृती हे समीकरणच आहे. नागराज मंजुळेची गोष्ट आता कॅमेरामन सुधाकर रेड्डी आपल्या दिग्दर्शनातून मांडणार आहेत. तर 'नाळ' सिनेमानिमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. नागराजचा प्रत्येक सिनेमा नवा असतो, तसाच हा नाळ.... एका नव्या गोष्टीसह प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे.


कोण आहे हा चिमुकला?


नागराजच्या प्रत्येक सिनेमात आपल्याला नवं कॅरेक्टर पाहायला मिळतं. नाळ या सिनेमात आई... जाऊ दे न व असा गोड हट्ट करणारा चैतन्य म्हणजे श्रीनिवास पोकळे. नाळ या सिनेमाची कथा ही चैतन्य भोवतीच फिरताना दिसते. एका लहानमुलाचं भावविश्व या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून तर हा मुलगा प्रत्येकाच्या मनावर छाप पाडतो हे नक्की. 


या सिनेमात पुन्हा एकदा नागराजच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. चैतन्यच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे साकारत आहे. हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.