मुंबई : दोन आठवड्यांपुर्वी ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेता नकुल मेहताला (Nakul Mehta) कोरोना व्हायरसची लागण झाली होती. आता नकुलची प्रकृती स्थिर आहे. पण चिंताजनक गोष्ट म्हणजे आता नकुलची पत्नी जानकी पारेख (Janaki Parakhe) आणि 11 महिन्यांचा मुलगा सूफी कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जानकीने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कठीण क्षण शेअर केले आहेत . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलासोबत रुग्णालयातील फोटो  पोस्ट करत जानकी म्हणाली, 'कोविड सारखा विषाणू उशिरा का होईना विळख्यात घेईल हे मला नेहमी कुठे ना कुठे माहीत होतं. पण मागच्या आठवड्यात जे घडले ते माझ्या कल्पनेत नव्हतं. दोन आठवड्यांपुर्वी  माझा पती कोरोनाच्या विळख्यात सापडला. काही दिवसांनंतर माझ्यात देखील सौम्य लक्षणं मला आढळली.'



पुढे ती म्हणाली. 'माझ्या नंतर माझ्या 11 महिन्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली. त्याला 104.2 एवढा ताप होता. माझं मूल कोविडच्या आयसीयू वॉर्डमध्ये होतं. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात जाण्यापासून ते 3 आयव्ही बसवण्यापर्यंत. रक्ताच्या अनेक तपासण्या, आरटी-पीसीआर, सलाईनच्या बाटल्या, अँटीबायोटिक्स, इंजेक्शन्स... कितीतरी वेळा वाटायचं की एवढ्या लहान मुलात सगळं सहन करण्याची ताकद कशी असेल?'


तीन दिवसांनंतर अखेर सुफीची प्रकृती स्थिर आहे. एवढंच नाही तर जानकीने कठीण काळात ज्यांनी सुफीची काळजी घेतली त्यांचे आभार मारले. शिवाय तिने डॉक्टरांचे देखील आभार मानले.  नंतर मुल मास्क लावू शकत नाहीत. त्यांना लस नाही. त्यामुळे त्यांची विषेश काळजी घ्या... असं देखील जानकी म्हणाली.