मुंबई : बॉलीवूडचे असे अनेक चित्रपट आहेत ज्याचे पुढचे भाग देखील प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. विशेषतः त्या चित्रपटातील काही पात्र अजरामर झाली आहेत. त्यांचा उल्लेख ऐकला की प्रेक्षकांचा उत्साह वाढतो. अशीच एक हिट जोडी 'वेलकम' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेलकम चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. विशेषत: या चित्रपटातील तीन पात्रे जी अनिल कपूर, नाना पाटेकर आणि परेश रावल यांनी साकारली आहेत.  या त्रिकुटाने तिसऱ्या भागासाठी कमबॅक केले आहे.


परेश रावल, नाना पाटेकर आणि अनिल कपूर वेलकम 3 साठी परतले असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील लवकरच पूर्ण होणार आहे. टीमचं सध्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 2022 च्या मध्यापर्यंत तो फ्लोअरवर आणण्याची तयारी केली आहे.



या चित्रपटातील तीन मुख्य कलाकारांनीही या टीमचा भाग बनण्यास होकार दिला आहे. या तिघांशिवाय या चित्रपटात एका मोठ्या स्टारला कास्ट करण्याचीही तयारी सुरू आहे. हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट असेल.


पहिला भाग अक्षय कुमारच्या उपस्थितीत जबरदस्त हिट झाला होता. या चित्रपटाचा पहिला भाग 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांच्या यादीत होता.



या तिघांशिवाय या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ देखील होते.  प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान या चित्रपटात शेवटचे दिसले होता. त्यानंतर 2009 मध्ये फिरोज खान यांचे निधन झाले. या चित्रपटातील नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांची जोडी खूप पसंत केली जात होती.