रजनीकांतने राजकीय एण्ट्रीबाबत पुन्हा विचार करावा: नाना पाटेकर
रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला ही चांगलीच बाब आहे. मात्र, हा निर्णय घेऊन रजनीकांतने मोठी जोखीम उचललली आहे.
मुंबई : अभिनेता रजनीकांत यांना राजकारणात एण्ट्री केल्याबाबत नाना पाटेकर यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देता देता पाटकेर यांनी रजनीकांत यांनी आपल्या राजकारण प्रवेशाबाबत पुन्हा एकदा विचार करावा असा सल्लाही दिला.
नाना पाटेकर यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला ही चांगलीच बाब आहे. मात्र, हा निर्णय घेऊन रजनीकांतने मोठी जोखीम उचललली आहे. त्याने आपले सर्व स्टारडम डावावर लावल्या सारखे आहे. नानांनी पुढे म्हटले आहे की, रजनीकांत यांनी आपल्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करायला हवा.
पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी म्हटले आहे की, रजनीकांत यांनी लोकांना दिलेली अश्वासने जर पूर्ण करू शकले नाहीत तर, त्याचा परिणाम त्यांच्या चित्रपटावरही होऊ शकतो. रजनी हे अत्यंत सरळ व्यक्ती आहेत त्यामुळे राजकारणासारख्या क्षेत्रात ते आले आहेत. त्यामुळे मला भीती वाटते. महत्त्वाचे असे की, राजकारणात लागणारी तडजोड करण्याची वृत्ती आमच्यात नाही, असेही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.