Natasa Stankovic : क्रिकेटर हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविकचा एका नवीन प्रोजेक्ट समोर आला आहे. नताशाने नुकताच एक टीझर शेअर केला आहे. जुलैमध्ये हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर ती आपल्या देशात सर्बियाला परतली. मुलगा अगस्त्यसोबत ती नुकतीच भारतात परतली. आता तिने चाहत्यांना तिच्या पहिल्या प्रोजेक्टची झलक दाखवली आहे. काही तासांपूर्वी तिने एक फोटो पोस्ट केला आणि गायक प्रीत इंदरसोबत 'तेरे करके' म्युझिक व्हिडीओचा पहिला लूक शेअर केला आहे. नताशाच्या या फोटोवर हार्दिक पांड्याच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाचा पहिला प्रोजेक्टचा टीझर रिलीज झाला आहे. 'तेरे करके' या म्युझिक व्हिडीओच्या टीझरमध्ये नताशाची ग्लॅमरस अंदाज बघायला मिळत आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये तिचा डान्स व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 



हार्दिक पांड्याच्या भावाची प्रतिक्रिया काय? 


 


नताशाचे 'तेरे करके' हे गाणं 8 ऑक्टोबर रोजी Play DMF या युटूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. याआधी नताशाने तिच्या या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'तेरे करके'च्या तालावर नाचण्यासाठी तयार व्हा. नताशाच्या या पोस्टवर हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याने कमेंट केली आहे. 


 



 


कृणाल पांड्याने नताशाच्या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून प्रतिक्रिया दिली आहे. त्याच वेळी चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या विभक्त झाल्यानंतरच्या कामाबद्दलच्या समर्पणावर देखील टिप्पणी केली आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की, ती आता तिच्या बाळासाठी काम करत आहे. मजबूत स्त्री. पोस्टरवरील तिच्या या लूकचे सोशल मीडियावर कौतुक देखील होत आहे. त्यासोबतच काही चाहत्यांनी आई, ती आईच असते. तर काही चाहत्यांनी तिला या गाण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. नताशाच्या या नवीन प्रोजेक्ट पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. 


नताशाचा नवीन प्रोजेक्ट


नताशाच्या नवीन प्रोजेक्टबद्दल एका सूत्राने पिंकविलाशी बोलताना सांगितले आहे की, नताशाला आता तिचे सर्व लक्ष तिच्या कामावर केंद्रित करायचे आहे. म्हणूनच ती भारतात परतली आहे. अलीकडेच ती चंदीगडमध्ये एका गाण्याचे शूटिंग करताना दिसली होती आणि हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतरचा तिचा हा पहिला प्रोजेक्ट आहे.