Natasa StanKovic Hardik Pandya's Real Divorce Reason : अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्यां यांनी गेल्या महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त झाल्याचे सांगितले. दोघं विभक्त होण्यामागे वेगवेगळी कारणं समोर येत होती. आता कथितपणे त्याचं खरं कारण समोर आल्याचं म्हटलं जातं आहे. नताशानं हार्दिकपासून विभक्त होण्याचं कारण त्याचं स्वत: मध्येच गुंतून राहणं होतं. नताशा आणि हार्दिकच्या एका जवळच्या व्यक्तीनं खुलासा केला की नताशा या निर्णयानं आनंदीत आहे. तिनं हार्दिकसोबत राहण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ती अपयशी ठरली. त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स नावच्या रिपोर्ट्सनुसार, सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, नताशा स्टेनकोविकसाठी हार्दिक खूप शो ऑफ करायचा. तो स्वत: मध्येच गुंतलेला असायचा. या सगळ्या गोष्टी सतत होत होत्या आणि नताशाच्या सहनशक्तीच्या हे पार गेलं. नताशाला ही जाणीव होऊ लागली की ते दोघे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत. हार्दिकनं नताशाला त्याच्याप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केला पण तिला असं काही करता येत नव्हतं तिला अनकम्फर्टेबल वाटतं होतं. 



सूत्रांनी पुढे दावा केला की हे कधी न संपणारी प्रोसेस आहे. ती खूप दमली होती. नताशा, हार्दिकसोबत बॅलेन्स करू शकत नव्हती. त्यामुळए नताशानं एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. नताशानं यावर खूप विचार केला पण जेव्हा ते होऊ शकलं नाही तेव्हा तिनं तिचा निर्णय घेतला. नताशासाठी हा फार दु:खद निर्णय होता. हे एक आठवड्यात किंवा एका दिवसात झालं नाही तर हळू हळू आणि सतत होऊ लागलं. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला होता. 


नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी मे 2020 मध्ये लग्न केलं आणि फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं. तर या वर्षी जुलैमध्ये विभक्त झाले. दोघांनी 4 वर्ष सुखी संसार केला. त्यांना एक मुलगा असून अगस्त्य असं त्याचं नाव आहे. आता घटस्फोटानंतर ते दोघं मिळून अगस्त्यचा सांभाळ करणार आहेत. 


हेही वाचा : 'शाका लाका बूम बूम' च्या संजूनं केला साखरपुडा! जाणून घ्या होणारी बायको कोण?


हार्दिक पांड्याशी विभक्त झाल्यानंतर नताशा स्टेनकोविक तिच्या सर्बियामध्ये असलेल्या घरी गेली होती. तिथे ती तिच्या 4 वर्षांच्या मुलांसोबत एन्जॉय करत होती. त्याच्यासोबत फिरताना दिसली. तर ते दोघं विभक्त झाल्यानंतर हार्दिकचं नाव जॅस्मिन वालियाशी जोडण्यात आलं आहे. ते दोघं डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. त्यासोबत त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.