नताशानं हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटावर पुन्हा दिली हिंट! तर संतप्त नेटकरी म्हणाले...
Natasa Stankovic Post Viral : नताशानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुन्हा दिली घटस्फोटावर हिंट!
Natasa Stankovic Post Viral : लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खेळी मुळे आणि त्याच्या पत्नीमुळे तो चर्चेत आहे. त्या दोघांविषयी सुरु असलेल्या चर्चांमध्ये कोणीही पुढे येऊन काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण अनेक रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात काही योग्य सुरु नाही. त्यात नताशा सतत सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करते ज्यावरून ती हार्दिक आणि तिच्यात सुरु असलेल्या सगळ्या गोष्टीविषयी हिंट देत असल्याचं वाटतंय. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आणखी रंगू लागल्या आहेत. आता नताशानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.
काल 1 जून रोजी नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती गाडीत असल्याचं दिसत आहे. तर गाडीत असताना नताशा बूमरॅन्ग करताना दिसली. तर नताशानं त्यावेळी प्रिंटेड स्कार्फसोबत संपूर्ण पांढरे कपडे परिधान केला आहे. त्यात की अगदी सुंदर दिसते. कॅमेऱ्यासमोर सुंदर अशी स्माईल देताना नताशा दिसते. नताशाचे सुंदर झुमके आणि कूल शेड्स सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत. तर हा शेअर करत नताशानं कॅप्शन दिलं की हाय.
कॅप्शननं दिली हिंट?
दरम्यान, त्या नंतर नताशानं शेअर केलेल्या पुढच्या स्टोरीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यात नताशा कारमध्ये असून तिच्या हातात ब्लॅक कॉफी असल्याचं तिनं सांगितलं. त्याचा फोटो शेअर करत त्यावर तिनं एक नोट शेअर केली आणि म्हणाली चालत्या गाडीत, पूर्ण पांढरे कपडे परिधान करून ब्लॅक कॉफी पिते. तर तिनं तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारला की त्यांना काय वाटतं? की ती कॉफी सांडेल की नाही. तिनं लिहिलं की 'विल आय स्पिल द कॉफी.'
नेटकरी संतप्त!
यावर नताशा आणि हार्दिकचे चाहते अंदाज बांधत आहेत की तिनं यावेळी ही गोष्ट सांगण्यासाठी म्हण वापरली आहे. तिचं यावेळी कोणत्या गोष्टीचा खुलासा करणं असा आहे. त्यावरून सोशल मीडियावर आता प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेक नेटकरी नताशावर संतापले आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'भावनांशी खेळू नकोस.' अशा कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, या आधी बॉम्बे टाइम्सनं दिलेल्या एक रिपोर्टनुसार, हार्दिक आणि नताशा घटस्फोट घेणार आहेत. त्या दोघांच्या जवळच्या व्यक्तीनं खुलासा केला की ते गेल्या 6 महिन्यांपासून वैवाहिक आयुष्यात आनंदी नाही. त्यामुळे ते घटस्फोट होण्याची शक्यता आहे. त्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये एक रिपोर्ट समोर आली आहे की जर नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट झाला तर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के संपत्ती ही नताशाला द्यावी लागेल.